आम्ही आजच बहुमत सिद्ध करू : रावसाहेब दानवे

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 26 November 2019

देवेंद्र फडणवीस सरकारला बहुमताच्या अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागणार असून, आम्ही आजच रात्री नऊ वाजेपर्यंत आमचे बहुमत सिद्ध करू, असे भारतीय जनता पक्षाचे नेते रावसाहेब दानवे यांनी आज (मंगळवार) म्हटले आहे.

मुंबई : देवेंद्र फडणवीस सरकारला बहुमताच्या अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागणार असून, आम्ही आजच रात्री नऊ वाजेपर्यंत आमचे बहुमत सिद्ध करू, असे भारतीय जनता पक्षाचे नेते रावसाहेब दानवे यांनी आज (मंगळवार) म्हटले आहे.

भाजपचे सगळे आमदार आज मुंबईत गरवारे क्लबमध्ये भेटणार आहेत. भाजपने आपल्याकडे 170 आमदार असल्याचा दावा केला आहे. महाविकास आघाडीनेही आपल्याकडे 162 आमदार असल्याचे म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने आज निकाल देताना उद्या बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार आता बहुमत चाचणीत नेमके काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

न्यायालयाच्या निकालानंतर वेगवान घडामोडी घडत असताना दानवे यांनी खळबळजनक दावा केला आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानुसार बुधवारी संध्याकाळी 5 वाजता चाचणी होणार आहे. बहुमत सिद्ध करण्यासाठी फडणवीस सरकारकडे 30 तासांची मुदत आहे. पण, दानवेंच्या दाव्यानुसार भाजप आजच आपले बहुमत सिद्ध करू शकते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bjp will prove majority today 9 pm says bjp leader raosaheb danve