राज्यसभा निवडणुकीत भाजपच्या तिन्ही जागा जिंकून येतील; महाडिकांचा दावा

Dhananjay Mahadik
Dhananjay Mahadikesakal
Summary

भाजपनं कोल्हापूरमधून धनंजय महाडिक यांना उमेदवारी जाहीर केलीय.

राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election 2022) भाजपकडून काल उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलीय. भाजपकडून माजी रेल्वे मंत्री पियूष गोयल (Piyush Goyal) आणि डॉ. अनिल बोंडे (Anil Bonde) यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आलीय. तसंच, भाजपकडून तिसऱ्या जागेसाठीही उमेदवार जाहीर करण्यात आलाय. कोल्हापूरमधून धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांना उमेदवारी जाहीर झालीय.

उमेदवारी जाहीर होताच धनंजय महाडिकांनी माध्यमांशी संवाद साधलाय. ते म्हणाले, राज्यसभेवर तिसरी जागा भाजपची असणार आहे. यासाठी आम्हाला 10 मतांची आवश्यकता असून त्याची व्यवस्था आम्ही केलीय. भाजपच्या (BJP) तिन्ही जागा जिंकून येतील, असा आम्हाला विश्वास आहे. महाविकास आघाडीच्या आमदारांमध्ये सध्या नाराजी पहायला मिळत आहे. त्यामुळं याचा फायदा आम्हाला निश्चित होणार आहे. या निवडणुकीत कोणत्याही प्रकारचा घोडेबाजार होणार नाहीय. तसंच काँग्रेसच्या (Congress MLA) नाराजीचा फायदाही आम्हाला होणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Dhananjay Mahadik
माझा पिंडच राजकीय संघर्षाचा, मला कोणीही थांबवू शकत नाही : जयकुमार गोरे

राज्यसभा निवडणुकीसाठी आता चुरस आणखी वाढलीय. शिवसेना (Shiv Sena), काँग्रेसकडून उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहेत. त्यानंतर भाजपकडून काल दोन यादी जाहीर करण्यात आल्या आहेत. पहिल्या यादीत भाजपकडून पियूष गोयल आणि अनिल बोंडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यानंतर तिसऱ्या जाागेचा सस्पेन्स कायम होता. अखेरीस तिसरी जागा लढवणार असल्याचं भाजपकडून स्पष्ट करण्यात आलंय. तिसऱ्या जागेसाठी कोल्हापूरमधून धनंजय महाडिक यांना उमेदवारी देण्यात आलीय. त्यामुळं या निवडणुकीत मोठी चुरस पहायला मिळणार आहे.

Dhananjay Mahadik
BSP : रामपूर लोकसभा पोटनिवडणूक बसपा लढवणार नाही; मायावतींचा मोठा निर्णय

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com