कमळ फुलवण्यासाठी अधिवेशन नवी मुंबईत

सकाळ न्यूज नेटवर्क
Saturday, 15 February 2020

नवी मुंबई महापालिकेत कमळ फुलवण्यासाठी भाजपने प्रदेश कार्यकारिणीचे अधिवेशन नवी मुंबईत आयोजित केले आहे. शनिवार (ता. १५) आणि रविवार (ता.१६) असे दोन दिवस अधिवेशन होणार आहे.

मुंबई - नवी मुंबई महापालिकेत कमळ फुलवण्यासाठी भाजपने प्रदेश कार्यकारिणीचे अधिवेशन नवी मुंबईत आयोजित केले आहे. शनिवार (ता. १५) आणि रविवार (ता.१६) असे दोन दिवस अधिवेशन होणार आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

पहिल्या दिवशी राज्यातील भाजप आमदार, खासदार, महापौर, जिल्हाध्यक्ष आदींच्या बैठका होणार आहे तर दुसऱ्या दिवशी बूथ प्रमुखापासून ते सरपंच, नगराध्यक्ष यांच्या बैठका होणार आहे. या दोन दिवसांत नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुकीची रणनीतीची चर्चा होणार आहे. 

‘एनआयए’कडे तपास देण्यावरून शिवसेना व ‘राष्ट्रवादी’त मतप्रवाह

नवी मुंबई महानगरपालिका स्थापन झाल्यापासून मुळचे शिवसेनेचे नंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेले आणि सध्या भाजपमध्ये असलेले गणेश नाईक यांची नवी मुंबई महापालिकेवर सत्ता आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये प्रवेश करताना नाईक यांचे समर्थक नगरसेवक भाजपमध्ये गेले. भाजप नाईक यांच्या नेतृत्वाखाली नवी मुंबईत सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न करीत आहे तर शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस या तीन पक्षांची महाविकास आघाडी नवी मुंबई महापालिका लढणार आहे. त्यामुळे भाजपपुढे महाविकास आघाडीचे जबरदस्त आव्हान निर्माण झाल्याने निवडणुकीपूर्वी वातावरण तयार करण्यासाठी हे अधिवेशन नवी मुंबईत घेण्यात आल्याचे भाजपकडून सांगण्यात येते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: BJP working committee session in new mumbai politics