esakal | राज्यात पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
sakal

बोलून बातमी शोधा

Rain

पुढील 4 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज, 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : राज्यात गेल्या आठवड्यात पावसाने (maharashtra rain update) जोरदार हजेरी लावली. त्यामुळे मराठवाड्यात पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर मात्र पावसाने एक-दोन दिवस उसंत घेतली. आता परत येत्या चार ते पाच दिवसांत महाराष्ट्रात पावसाच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. तसेच कोकण (Konkan), मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात (marathwada rain) मुसळधार ते अतिमुसळधार पावासाचा अंदाज (maharashtra weather forecast) मुंबई प्रादेशिक हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

हेही वाचा: आभाळ फाटलं : चाळीसगाव पाण्यात; कन्नड घाट दरडीखाली

पावसाने मध्ये अनेक दिवस दडी मारली होती. त्यानंतर गेल्या सोमवारपासून पाऊस राज्यातील अनेक भागात सक्रीय झाला. त्यामुळे मराठवाड्यातील काही जिल्ह्यात आणि चाळीसगाव परिसरात ढगफुटीसदृश्य पाऊस झाला. जोरदार पावसाने तितुर, डोंगरी, वाडी या उपनद्यांसह गिरणा नदीलाही पूर आला. पुराचे पाणी गावांमध्ये शिरले असून, २० गावांचा संपर्क तुटला होता. तर पुरात वाहून गेल्याने एका महिलेसह गुरांचाही बळी गेला होता. त्यानंतर एक दिवस पावसाने उसंत घेतली. आता परत पाऊस सक्रीय होणार आहे. ८ सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस बरसणार असल्याचा अंदाज हवामाने विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे असे देखील हवामान विभागाने म्हटले आहे.

'या' जिल्ह्यांना अलर्ट -

चार आणि पाच सप्टेंबरला रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावासाचा अंदाज व्यक्त केला असून सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. तसेच सहा सप्टेंबरला कोकणातील रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी, तर मराठवाड्यातील लातूर, परभणी, नांदेड आणि हिंगोलीमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यानंतर सात सप्टेंबरला नाशिक, औरंगाबाद, पालघरस ठाणे, जालना, पुणे, सातारा, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यात, तर ८ सप्टेंबरला पालघर, पुणे, सातारा, रत्नागिरी आणि पालघर या जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

loading image
go to top