Vidhan Sabha 2019 : भाजपचा पहिला उमेदवार जाहीर? चंद्रकांत पाटलांची घोषणा

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 सप्टेंबर 2019

विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून सर्वच पक्ष विधानसभेच्या तयारीत लागले आहेत. त्यातच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून  डॉ. अतुल भोसले यांना उमेदवारी देणार असल्याचे सांगत अप्रत्यक्षरित्या पहिला उमेदवार जाहीर करून टाकला आहे.

कराड : विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले असून सर्वच पक्ष विधानसभेच्या तयारीत लागले आहेत. त्यातच भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघातून  डॉ. अतुल भोसले यांना उमेदवारी देणार असल्याचे सांगत अप्रत्यक्षरित्या पहिला उमेदवार जाहीर करून टाकला आहे.

'ऑक्टोबर महिन्याच्या १५ ते २० या तारखेदरम्यान महाराष्ट्रामध्ये विधानसभेच्या निवडणुका लागतील. गेल्या पाच वर्षांमध्ये भारतीय जनता पक्षाने सर्व निवडणुका जिंकलेल्या आहेत. कराड दक्षिण मतदारसंघातून डॉ. अतुल भोसले भारतीय जनता पक्षाचे उमेदवार असणार आहेत. त्यांना जनतेने आमदार करावे, आम्ही मंत्री करतो,' असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. 

कराड दक्षिण हा काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा मतदार संघ आहे. डॉ. अतुल भोसले यांची लवकर उमेदवारी जाहीर करून एकप्रकारे पाटील यांनी पृथ्वीराज चव्हाण आणि काँग्रेसला धक्काच दिला असल्याचे मानावे लागेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Bjps Atul Bhosle Candidate From Karad South says Chandrakant Patil