
मुंबई : लष्करी अळीमुळे राज्यातील धान उत्पादकांचे मोठे नुकसान झाले आहे. तरीही अधिकारी जशी माहिती देतात तशीच आम्हाला सांगता, प्रस्ताव येऊनही त्यावर निर्णय घेतला जात नाही. नस्ती निपटारा कायद्याचा भंग करणारे अधिकारी ‘वाल्मीक कराड’ आहेत. त्यांना शोधा, अशा शब्दांत सरकारला घरचा आहेर देत भाजपचे सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत वाभाडे काढले.