Ajit Pawar : 'इतक्यांदा चुकणारा मुख्यमंत्री मी पाहिला नाही', अजित पवारांनी वाचला शिंदेंच्या चुकांचा पाढा

Ajit Pawar News
Ajit Pawar Newsesakal

मुंबईः महाविकास आघाडीची तिसरी वज्रमूठ सभा आज मुंबईत होत आहे. या सभेसाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गटाच्या नेत्यांची उपस्थिती आहे. यावेळी अजित पवार यांनी तडाखेबाज भाषण केलं.

अजित पवार बोलतांना म्हणाले की, इतक्यांदा चुकणारा मुख्यमंत्री मी पाहिला नाही. द्रोपदी मुर्मू यांना ते पंतप्रधान म्हणतात, निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग यातला फरक मुख्यमंत्र्यांना कळत नाही. शिवाय 'साडेतीनशे पन्नास किलोमीटर' मेट्रो केल्याचं त्यांनी सांगितलं. परंतु साडेतीनशे पन्नास, हा काय प्रकार आहे? असा सवाल पवारांनी उपस्थित केला.

Ajit Pawar News
BKC MVA Rally: मुंबईचं मराठीपण बाळासाहेबांमुळं टिकलं पण...; अजित पवारांनी घेतला समाचार

काय म्हणाले अजित पवार?

  • बाजार समिती निवडणुकीतून जनता आपल्यासोबत असल्याचं स्पष्ट झालं आहे

  • मराठी माणूस टिकला तो स्व. बाळासाहेब ठाकरेंमुळे

  • परंतु ते काहींना सहन झालं नाही आणि राजकारण केलं

  • सध्या शेतकरी अवकाळी पावसामुळे पिचला आहे

  • मुख्यमंत्री मात्र राजकारण करण्यात मश्गूल आहेत

  • अजूनही पाच तारखेपर्यंत अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे

  • मुंबईत पाऊस नसला तरी राज्यात शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे

  • निवडणुका का लावल्या जात नाहीत

  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेतल्या जात नाहीत?

  • निवडणुका घेतल्या तर हरण्याची भीती त्यांना आहे

  • दगाफटका करुन आणि गद्दारी करुन आलेलं हे सरकार आहे

  • तरुण-तरुणींच्या हाताला काम नाहीये

  • अलिकडच्या दहा महिन्यांच्या काळात इतक्यांदा मुख्यमंत्री खूपदा चुकले

  • देशाचे पंतप्रधान द्रोपदी मुर्मू असं ते म्हणाले होते

  • बारा-तेरा कोटी जनतेचं नेतृत्व तुम्ही करत आहात

  • मुंबईत साडेतीनशे पन्नास किलोमीटर मेट्रो केली

  • जमत नसेल तर नोट काढा, ती वाचा

  • साडेतीनशे पन्नास कशाला म्हणतात?

  • मागेही एमपीएससी आणि निवडणूक आयोगात गल्लत केली होती

  • अलिकडे कुणी काहीही बातम्या देतं

  • परंतु त्याकडे अजिबात लक्ष द्यायची गरज नाही

  • 'देखो महाराष्ट्र' अशी जाहिरात महाराष्ट्र विभागाने काढली

  • तुम्हाला मराठीचं वावडं आहे का? बघा महाराष्ट्र, असं म्हणायचं ना

  • आता जनताच तुम्हाला बघणार आहे, हे लक्षात ठेवा

अजित पवार म्हणाले, मुंबईचं मराठीपण टिकवण्यात आणि मुंबईचा मानसन्मान कानाकोपऱ्यात वाढवण्याचं काम कोणी केलं असेल तर ते हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. त्यांनी अतिशय महत्वाची भूमिका बजावली, शिवसेनेमुळं मुंबई टिकली. मुंबईत मराठी माणसाचा अभिमान, स्वाभिमान कायम राहिला. मराठी माणूस एकजूट करुन राहिला, हे वास्तव आपल्याला नाकारता येणार नाही. हेच नेमकं काहींच्या डोळ्यावर यायला लागलं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com