

Soya Bean Seed Scam
esakal
अमरावती/ वर्धा/ अकोला: सोयाबीन बियाण्यांची उगवण न झाल्याच्या वाढत्या तक्रारींनंतर प्रशासनाने संबंधित कंपन्यांविरोधातील कारवाईला गती दिली आहे. अमरावती जिल्ह्यात सात बियाणे कंपन्यांविरोधात ३८ गुन्हे दाखल करण्यात आले असून, आणखी २५ गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, अमरावती विभागातील पाच जिल्ह्यांतील तक्रारींची संख्या ४६५० वर पोहोचली असून, प्रयोगशाळेतील प्रतिकूल अहवालांच्या आधारे सहा कंपन्यांच्या परवान्यांवर कारवाई करण्याची शिफारस कृषी आयुक्तालयाकडे करण्यात आली आहे.