तारापूर एमआयडीसीत वायू गळती; चार कामगारांचा मृत्यू; दोघांची प्रकृती चिंताजनक
Gas leak at a factory in Boisar's Tarapur MIDC leaves four workers dead:
दुपारी या कंपनीत एलबेंडोझोल सुरु होते. उत्पादन सुरु असताना नायट्रोजनद्वारे प्रक्रिया होणाऱ्या टाकीच्या परिसरात नायट्रोजन वायूची गळती झाली. ज्या ठिकाणी हे कामगार काम करत होते हे सर्व बाधित झाले.
बोईसर : तारापूर औद्योगिक वसाहतीमधील मेडली फार्मास्युटिकल्स (प्लॉट नंबर एफ - १३) या कंपनीत वायू गळती झाल्याने चार कामगारांचा मृत्यू झाला आहे. या कंपनीतील दोन कामगार गंभीर असून त्यांना अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आहे.