परमबीर सिंग यांना तूर्तास अटकेपासून दिलासा

परमबीर सिंग ठाण्याचे पोलिस आयुक्त असताना घाडगे पोलिस निरीक्षक होते. सिंग यांच्या चुकीच्या आदेशाचे पालन न केल्याने माझ्याविरोधात त्यांनी कारस्थान रचल्याची तक्रार घाडगे यांनी केली होती.
Param Bir singh
Param Bir singhGoogle
Updated on
Summary

परमबीर सिंग ठाण्याचे पोलिस आयुक्त असताना घाडगे पोलिस निरीक्षक होते. सिंग यांच्या चुकीच्या आदेशाचे पालन न केल्याने माझ्याविरोधात त्यांनी कारस्थान रचल्याची तक्रार घाडगे यांनी केली होती.

मुंबई : मुंबईचे माजी पोलिस आयुक्त आणि महाराष्ट्र होमगार्डचे महासंचालक परमबीर सिंग (Param Bir Singh) यांना मुंबई उच्च न्यायालयाने (Bombay High Court) अटकेपासून संरक्षण दिले आहे. पोलिस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी परमबीर सिंग यांच्याविरोधात अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी येत्या ९ जून पर्यंत सिंग यांना अटक केली जाणार नाही, असी ग्वाही राज्य सरकारच्या वतीनं उच्च न्यायालयाने दिली आहे. तोपर्यंत सिंग यांनी तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य करावे, अशी विनंतीही राज्य सरकारने उच्च न्यायालयात केली आहे. (Bombay HC gives protection from arrest to ex-Mumbai Police Commissioner Param Bir Singh)

Param Bir singh
मोदींना महाराष्ट्र दिसला नाही? भाजपनेत्यांना गुजरातचाच पुळका

परमबीर सिंग ठाण्याचे पोलिस आयुक्त असताना घाडगे पोलिस निरीक्षक होते. सिंग यांच्या चुकीच्या आदेशाचे पालन न केल्याने माझ्याविरोधात त्यांनी कारस्थान रचल्याची तक्रार घाडगे यांनी केली होती. सिंग यांच्या वर्तणुकीबद्दल तसेच त्यांच्या संपत्तीबद्दलही घाडगे यांनी आरोप केले. घाडगेंनी दिलेल्या तक्रारीनुसार अकोला येथे परमबीर सिंग यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच सीआयडीने तपासही सुरू केला. गुन्हा रद्द करावा, या मागणीसाठी परमबीर सिंग यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठात याचिका दाखल केली. पण उन्हाळ्याच्या सुट्टीमुळे न्यायालयाने ९ जूनपर्यंत या प्रकरणाला स्थगिती दिली आहे. ९ जूननंतरच नियमित खंडपीठासमोर सुनावणी होणार हे स्पष्ट झाले आहे.

Param Bir singh
'देशाला तुमचे अश्रू नाही, तर लसी हवीय'

दरम्यान, २१ मे रोजी रात्री बारा वाजेपर्यंत या प्रकरणाची सुनावणी सुरू होती. त्यानंतर सुनावणी पूर्ण होईपर्यंत परमबीर सिंग यांना अटक करू नये, असा आदेश न्यायालयाने दिला होता. आज पुन्हा सुनावणी झाली. यावेळी ९ जूनपर्यंत अॅट्रॉसिटी प्रकरणी अटक करणार नाही, असे राज्य सरकारने उच्च न्यायालयात सांगितले. तसेच या कालावधीत सिंग यांनी तपास यंत्रणेला पूर्ण सहकार्य करावे, अशी विनंतीही उच्च न्यायालयात केली.

दुसरीकडे याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयातून या प्रकरणाशी संबंधित याचिका मागे घ्यावी. एकाच प्रकरणी एकाच वेळी दोन ठिकाणी दाद मागता येणार नाही, असे उच्च न्यायालयाने परमबीर सिंग यांना सांगितले आहे. परमबीर सिंग यांच्या वतीने याचिका मागे घेण्याबाबत सहमती दर्शवली आहे. यानंतर या प्रकरणाची सुनावणी ९ जून रोजी नियमित खंडपीठासमोर सुरू होईल, अशी माहिती देण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com