esakal | 'देशाला तुमचे अश्रू नाही, तर लसी हवीय'
sakal

बोलून बातमी शोधा

पंतप्रधान मोदी

'देशाला तुमचे अश्रू नाही, तर लसी हवीय'

sakal_logo
By
भाग्यश्री राऊत

नागपूर : लसीकरणाबाबत सीरमच्या एका वरिष्ठ संचालकाने एक मोठं वक्तव्य केलं होतं. त्यावरून महिला व बालकल्याण विकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. लसीकरणातील हा गोंधळ देशाला संकटात टाकणारी आहे. नरेंद्र मोदींनी कॅमेरासमोर रडण्याऐवजी हा गोंधळ निस्तरावा. देशाला तुमचे अश्रू नाही, तर लस हवीय! असा घणाघात ठाकूर यांनी केला आहे. (minister yashomati thakur criticized pm modi on vaccination)

हेही वाचा: औषधांसह सकारात्मकताच गुणकारी; बेदरकर कुटुंबाची कोरोनावर मात

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर लोकसभा मतदारसंघ असलेल्या वाराणसीतील डॉक्टरांशी शुक्रवारी संवाद साधला. यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे साधलेल्या या संवादादरम्यान मोदींना भावना अनावर झाल्या. कोरोनाने झालेल्या मृत्यूंमुळे मोदी भावूक झाले होते. कोरोनांशी दोन हात करताना आपण या लढाईत अनेक आप्तस्वकीयांना गमावलं, असं मोदी म्हणाले. त्यानंतर सीरमच्या एक वरिष्ठ संचालकाने लसीबाबत मोठं वक्तव्य केलं होतं. 'लसीचा उपलब्ध साठा आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) मार्गदर्शक सूचनांचा सरकारने विचार केला नाही', असं पुणे येथील लस उत्पादक सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे कार्यकारी संचालक सुरेश जाधव यांनी म्हटलं होतं. त्यानंतर यशोमती ठाकूर यांनी मोदींवर निशाणा साधला आहे. लसीकरणातील हा गोंधळ देशाला संकटात टाकणारा आहे. नरेंद्र मोदींनी कॅमेरासमोर रडण्याएवजी हा गोंधळ निस्तरावा. देशाला तुमचे अश्रू नाही, लस हवीय!, असे म्हणत त्यांना मोदींवर घणाघात केला.

loading image