Bombay High Court Alimony Ruling : पत्नीचे उत्पन्न पतीपेक्षा जास्त तर पोटगी नाही! मुंबई उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Interim Alimony Rejected : न्यायालयाने हिंदू विवाह कायदा 1955 च्या कलम 24 अंतर्गत निर्णय दिला. पोटगीचा उद्देश फक्त उदरनिर्वाहासाठी असून आलिशान जीवनासाठी नाही. महिला उच्चशिक्षित व नोकरीत असल्याने तिची आर्थिक गरज नसल्याचे न्यायालयाने मानले.
Bombay High Court

Bombay High Court

esakal

Updated on

Bombay High Court Rejects Interim Alimony Plea : पतीपेक्षा पत्नीचे उत्पन्न अधिक असल्यास तिला पोटगीचा हक्क नसतो,असा महत्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. परदेशातील महागडे राहणीमान हे पोटगीचे कारण ठरू शकत नाही, असे स्पष्ट निरीक्षण न्यायालयाने नोंदवले. अमेरिकेत राहणाऱ्या उच्चशिक्षित आणि नोकरदार महिलेची दरमहा एक लाख रुपयांची अंतरिम पोटगीची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com