आनंदराव अडसुळांच्या अडचणी वाढणार? दिलासा देण्यास 'HC'चा नकार

Anandrao adsul
Anandrao adsulsakal media

मुंबई : सिटी सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी (city cooperative bank scam) ईडीने शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ (shivsena mp anandrao adsul) यांना नोटीस पाठविली होती. मात्र, त्यांची प्रकृती ठीक नसल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ईडीची कारवाई टाळण्यासाठी अडसूळांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका (bombay high court on anandrao adsul case) दाखल केली होती. मात्र, उच्च न्यायालयाने त्यांना दिलासा देण्यास नकार दिला आहे.

Anandrao adsul
शिवसेना नेते ईडीच्या रडावर; आनंदराव अडसूळ यांना ईडीचा समन्स
Anandrao adsul
अडसूळ यांच्यावर आरोप असलेला सीटी बँक घोटाळा नेमका आहे तरी काय?

सिटी सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी आनंदराव अडसूळ यांना दुसऱ्यांदा ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. गेल्या दोन दिवसांपूर्वी त्यांच्या घरी ईडीचे अधिकारी पोहोचले होते. मात्र, त्याचवेळी अचानक त्यांची प्रकृती बिघडली. त्यानंतर त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यावेळी ईडीचे अधिकारी आनंदराव अडसूळ यांना चौकशीसाठी ताब्यात घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती. मात्र, प्रकृतीचे कारण पुढे केल्यामुळे त्यांच्यावर कारवाई होऊ शकली नाही. रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर परत ईडीकडून चौकशी केली जाणार असल्याने अडसूळ यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. आज त्यांच्या याचिकेवर सुनावणी सुरू असताना अडसुळांच्या वकिलांनी त्यांच्या आजारपणाचे कारण पुढे करून न्यायालयाने दिलासा द्यावा, अशी मागणी केली. तसेच ईडीचा गुन्हा आणि सुरू असलेली कारवाई कशा प्रकारे चुकीच्या पदधतीने केली जात असल्याचा युक्तीवाद अडसुळाच्या वकिलांनी केला. ही कारवाई राजकीय हेतून आणि सूडबुद्धीने करत असल्याचे अडसुळांच्या वकिलांचे म्हणणे होते. मात्र, बँकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. तक्रारदार आणि बँक अधिकाऱ्यांचे जबाब नोंदविले आहे. त्यानुसार अडसूळ यांचाही जबाब नोंदविणे गरजेचे आहे. आम्हाला राजकीय सूडबुद्धीशी देणंघेणं नसल्याचा युक्तीवाद ईडीच्या वकिलांनी केला. त्यावर न्यायालयाने आनंदराव अडसूळ यांना तुर्तास दिलासा देण्यास नकार दिला असून पुढील सुनावणी ८ ऑक्टोबरला घेणार असल्याचे सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com