असं कोणतं आभाळ कोसळणार आहे? वानखेडेंच्या याचिकेवर हायकोर्टाचा संतप्त सवाल|Bombay High Court On Sameer Wankhede Petition | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Bombay High Court On Sameer Wankhede Petition

असं कोणतं आभाळ कोसळणार आहे? वानखेडेंच्या याचिकेवर HC चा संतप्त सवाल

मुंबई : समीर वानखेडेंचा बार परवाना रद्द करण्यात आला आहे. त्याविरोधात समीर वानखेडेंनी (Sameer Wankhede) मुंबई उच्च न्यायालयात (Bombay High Court) धाव घेतली आहे. पण, न्यायालयानं तत्काळ सुनावणी घेण्यासाठी नकार दिला आहे. तत्काळ सुनावणी न घेतल्यास कोणतं आभाळ कोसळणार आहे. वानखेडेंनी काल याचिका दाखल केली आणि आज ती बोर्डावर कशी आली? असा संतप्त सवाल न्यायालयानं विचारला आहे.

हेही वाचा: समीर वानखेडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल; बारच्या परवान्यासाठी खोटी कागदपत्रे ?

समीर वानखेडेंनी मद्यपरवाना रद्द करण्याच्या ठाणे जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. न्यायमूर्ती गौतम पटेल आणि न्यामूर्ती जामदार यांच्या खंडपीठासमोर ही याचिका सुनावणीसाठी आली. तसेच ठाणे पोलिसांनी समीर वानखेडेंवर गुन्हा दाखल केला होता. तो रद्द करण्यासाठी देखील याचिका दाखल केली आहे. या दोन्ही याचिका सोमवारी सायंकाळी दाखल करण्यात आल्या. पण, या दोन्ही याचिका तातडीच्या सुनावणीसाठी बोर्डावर घेण्यात आल्या. त्यामुळे न्यायालयानं कोर्ट कर्मचाऱ्यांना सुनावलं आहे.

ठाण्यातील गुन्हा रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. पण, मद्यपरवान्याच्या याचिकेवर न्यायालयाने संतप्त सवाल उपस्थित केले आहेत. कुठलीही तातडीची याचिका आली की, नियमाप्रमाणे त्याला किमान तीन दिवसानंतरची तारीख दिली जाते. एखादा प्रतिभावंत अधिकारी असेल तर त्याला वेगळी वागणूक देण्याची गरज काय? असे सवाल उपस्थित करत कोर्ट कर्मचाऱ्यांना सुनावले. वानखेडेंच्या वकिलांना देखील फटाकरले. मद्यपरवाना रद्द झाल्याची याचिका आहे. मग या याचिकेवर आजच्या आज सुनावणी घेतली नाहीतर आभाळ कोसळणार आहे का? असा सवाल न्यायालयानं उपस्थित केला. तसेच तत्काळ सुनावणीस नकार देत सुनावणी पुढील तारीखेसाठी वर्ग करण्यात आली.

Web Title: Bombay High Court Pulls Court Staff Lawyer Denied Urgent Hearing On Sameer Wankhede Petition Bar Lincense

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..