Loudspeakers on Mosques: मशिदींवरील भोंग्यांवरुन हायकोर्टानं मुंबई पोलिसांना झापलं! दिले 'हे' आदेश

मशिदींवरील भोंग्यांवरुन काही महिन्यांपूर्वी राज्यातलं वातावरण ढवळून निघालं होतं.
loudspeakers on illegal mosques
loudspeakers on illegal mosquesesakal

मुंबई : मशिदींवरील भोंग्यांवरुन काही महिन्यांपूर्वी राज्यातलं वातावरण ढवळून निघालं होतं. यापार्श्वभूमीवर यासंदर्भात अनेक तक्रारी मुंबई पोलिसांकडे आल्या होत्या. पण पोलिसांकडून यावर कार्यवाही झालेली नाही. यामुळं आता खुद्द मुंबई हायकोर्टानंच याची दखल घेत मुंबई पोलिसांना झापलं आहे. (Bombay High Court reprimands Mumbai Police for not taking action against loudspeakers on Mosques)

हायकोर्टात आज यासंदर्भात सुनावणी झाली यावेळी कोर्टानं पोलिसांना चांगलचं फटकारलं. मशिदींवर सुरु असलेल्या भोंग्यांमुळं आवाजाचा त्रास होत असल्याच्या तक्रारी नागरिकांनी मुंबई पोलिसांकडे केल्या होत्या. पण या तक्रारींवर पोलिसांनी कारवाई केलेली नसल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळं मशिदींवरील भोंग्यांमुळं होणारं आवाजाचं प्रदुषण रोखण्यात मुंबई पोलीस अपयशी ठरले आहेत. हा एक प्रकारे कोर्टाचा अवमान असल्या सारखं आहे, असं कोर्टानं पोलिसांना झापताना म्हटलं आहे. (latest Marathi News)

loudspeakers on illegal mosques
Yasin Malik: फुटिरतावादी यासिन मलिकच्या फाशीची मागणी; NIAची दिल्ली हायकोर्टात धाव

दरम्यान, कोर्टानं पोलिसांना आदेश दिले की, "नागरिकांच्या तक्रारींवर कार्यवाही का झाली नाही याचं उत्तर कोर्टाला द्यावं" एका मुंबईकर नागरिकानं यासंदर्भात हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या प्रकरणाची पुढील सुनावणी २९ मे रोजी होणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com