%20-%20Copy.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
%20-%20Copy.jpg?w=480&auto=format%2Ccompress&fit=max)
सोलापूर : सामान्य असो की बडे व्यापारी, उद्योजक, शासकीय नोकरदारांना अमिषाच्या जाळ्यात ओढणाऱ्या सायबर गुन्हेगार कधी काय करतील, सांगता येत नाही. बुधवारी (ता. ११) सायबर गुन्हेगाराने चक्क पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या नावे बनावट फेसबूक खाते उघडले आणि त्यावरून मेसेज पाठवून ‘सीआरपीएफ’मधील मित्राचे फर्निचर स्वस्तात विकत घेण्याचे आवाहन केले. ही बाब पोलिस अधीक्षकांना समजताच त्यांनी तातडीने फेसबूकला रिपोर्ट पाठवून खाते बंद करण्यासाठी रिपोर्ट केला.
सायबर गुन्हेगारांनी जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक श्री. कुलकर्णी यांच्या आयपीएस अतुल कुलकर्णी या नावाने बनावट फेसबूक खाते उघडले. त्यानंतर त्या अकाऊंटवरून ‘सीआरपीएफ कॅम्पमधील माझा एक मित्र आशिष कुमार, तुम्ही त्याला तुमचा नंबर फॉरवर्ड कराल. तो घरातील फर्निचरच्या वस्तू दुसऱ्या हाताने विकत आहे. सर्व वस्तू चांगली किंमत आणि अतिशय स्वस्त आहेत. तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही घेऊ शकता, तुम्ही आशिष कुमारचे सामान घेऊ शकता, काही अडचण नाही, तातडीच्या बैठकीत संपूर्ण जबाबदारी माझी आहे’. असा मेसेज पाठविला. काही वेळात पोलिस अधीक्षकांना ही बाब समजली आणि त्यांनी ते बनावट फेसबूक अकाऊंट बंद करण्यासंदर्भातील रिपोर्ट केला. त्यांच्या ओळखीच्या सर्वांनाच त्यांनी बनावट फेसबूक खात्यासंदर्भातील माहिती देखील दिली. त्यामुळे कोणाचीही फसवणूक झाली नाही. याशिवाय कोणाचीही फसवणूक होऊ नये म्हणून पोलिस अधीक्षक श्री. कुलकर्णी यांनी त्या बनावट अकाऊंटवरून आलेला मेसेज आणि त्या अकाऊंटचा स्क्रिन शॉट काढून व्हॉट्सॲप स्टेटसला देखील ठेवला होता.
बनावट खाते बंद व्हायला लागतो दिवस
सोशल मिडियावरील फेसबूक, इन्स्टाग्राम, ट्विटर या माध्यमातून आपण अकाऊंट उघडलेले असल्यास ठरावीक दिवसांनी त्याचा पासवर्ड बदलायला हवा. पासवर्ड हा जन्मतारीख, गाडी क्रमांक असेच काहीसे असतात. त्यामुळे सायबर गुन्हेगार सहजपणे आपली फसवणूक करू शकतात, असे सायबर तज्ज्ञ सांगतात. बनावट अकाऊंट उघडल्यास त्यासंबंधीचा रिपोर्ट त्या वापरकर्त्यांसह इतरांनीही फेसबूकला करावा, जेणेकरून ते बनावट अकाऊंट लगेचच ब्लॉक होवू शकते, असे सोलापूर शहर सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीशैल गजा यांनी सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.