Fire Accident : स्वयंपाक बेतला जिवावर, सोलापूरमध्ये गॅस सिलिंडरच्या स्फोटात तिघांचा मृत्यू

अक्कलकोट रोड एमआयडीसीतील रूपम टेक्स्टाईलच्या पहिल्या मजल्यावर आग कामगार स्वयंपाक करताना गॅस सिलिंडरचा स्फोट
Gas cylinder explosion while cooking 3 workers died in Rupam Industries in Solapur
Gas cylinder explosion while cooking 3 workers died in Rupam Industries in Solapuresakal

सोलापूर : अक्कलकोट रोड एमआयडीसीतील रूपम टेक्स्टाईलच्या पहिल्या मजल्यावर काहीवेळापूर्वी आग लागली होती. कामगार सकाळचा स्वयंपाक करताना गॅस सिलिंडरचा स्फोट झाला.

पहिल्या मजल्यावर कारखान्याचा काही माल असल्याने क्षणातच आगीने रौद्र रूप धारण केले आणि खोलीत आग पसरली. प्रसंगावधान साधून दोघे बाहेर पडले, पण तिघांना बाहेर येता आले नाही. त्यात त्यांचा होरपळून जागीच मृत्यू झाला आहे.

Gas cylinder explosion while cooking 3 workers died in Rupam Industries in Solapur
Solapur News : पाण्याच्या हौदात अज्ञात इसमाने विषारी औषध टाकले; ७ जणांची प्रकृती गंभीर

आगीची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे प्रमुख केदार आवटे हे आपल्या सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी तात्काळ दाखल झाले. त्यानंतर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे अधिकारी, कर्मचारी देखील आले. पण, तोवर त्या तिघांचा मृत्यू झाला होता.

दहा गाड्या पाणी फवारून पाऊण तासात आग विझविण्यात आली. पण, सकाळचा स्वयंपाक तिघांच्या जीवावर बेतला. आगीचा भडका उडल्याने त्या तिघांना खोलीतून बाहेर पडता आले नाही. मृत कामगार बिहारचे असल्याची माहिती समोर येत आहे. या संदर्भातील तपास आता एमआयडीसी पोलिस करीत आहेत.

Gas cylinder explosion while cooking 3 workers died in Rupam Industries in Solapur
Solapur News: प्रदूषित सोलापुरात आता ४,७७८ इलेक्ट्रिक वाहने! शहरात साडेचार हजारांवर ईलेक्ट्रिक दुचाकींची विक्री

ठळक बाबी...

  • - सोलापुरातील एमआयडीसीतील रूपम टेक्स्टाईलच्या पहिल्या मजल्यावर आगीचा भडका

  • - कामगार सकाळचा स्वयंपाक करत होते, त्यावेळी गॅस सिलिंडरचा झाला स्फोट

  • - पाचपैकी दोघेजण सुखरूप बाहेर पडले, पण तिघांना बाहेर पडता आले नाही, त्या तिघांचा होरपळून जागीच मृत्यू

  • - अग्निशामक विभाग दहा मिनिटात घटनास्थळी; दहा गाड्या पाणी फवारून पाऊण तासात आग विझवली

  • - ग्राऊंड फ्लोअरवरील कारखान्याचे काही नुकसान नाही; पहिल्या मजल्यावरील कार्टुन बॉक्स, टॉवेल जळून खाक

  • - कारखान्याच्या पहिल्या मजल्यावर कारखान्याचा माल व कामगारांना राहण्याची एकत्रित होती व्यवस्था

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com