
कृषिमंत्री चौधरी यांच्यासमवेत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार गिरीश महाजन, आमदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी आमदार बाबुराव पाचरणे, आमदार बबनराव पाचपुते, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, प्रांताधिकारी सुधाकर भोसले आदी उपस्थित आहेत.
राळेगणसिद्धी : शेतक-यांच्या प्रश्नी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे उद्या शनिवार (ता. ३० जानेवारी)पासून उपोषणास बसणार आहेत.त्यांना त्यापासून परावृत्त करण्यासाठी केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी व राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आज दुपारी सव्वातीन वाजता राळेगण सिद्धीत दाखल झाले आहेत. हजारे यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी बंद खोलीत चर्चेला प्रारंभ केला आहे.
हजारे यांनी सन २०१८ च्या रामलीला मैदानावरील व सन २०१९ च्या राळेगणसिद्धीतील उपोषण आंदोलन केले होते. त्यावेळी पंतप्रधान कार्यालय व केंद्रीय कृषिमंत्री राधा मोहन सिंह यांनी लेखी आश्वासन दिले होते. परंतु, केंद्र सरकारने आश्वासनाची अमंलबजावणी केली नाही. त्यामुळे स्वामीनाथन आयोगानुसार शेतीमालाला दीडपट हमीभाव मिळावा, केंद्रीय कृषीमूल्य आयोगाला स्वायत्तत्ता मिळावी यासाठी हजारे यांनी ता. ३० जानेवारीपासून उपोषण आंदोलनाचा इशारा दिला होता.
हेही वाचा - सात-बारा उताऱ्यात झालाय मोठा बदल, करा अर्ज
हे नेते आहेत सोबत
कृषिमंत्री चौधरी यांच्यासमवेत राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार गिरीश महाजन, आमदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी आमदार बाबुराव पाचरणे, आमदार बबनराव पाचपुते, जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले, प्रांताधिकारी सुधाकर भोसले आदी उपस्थित आहेत.
गेल्या महिनाभरात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, आमदार गिरीश महाजन, आमदार राधाकृष्ण विखे पाटील, विधानसभेचे माजी सभापती हरिभाऊ बागडे, खासदार डॉ.सुजय विखे पाटील, खासदार डॉ. भागवत कराड आदींनी हजारे यांची भेट घेऊन त्यांचे मनधरणी केली होती. परंतु चर्चा नको, केंद्र सरकारने ठोस कार्यवाही करावी असे सांगत हजारे हे उपोषणावर ठाम होते.
संपादन - अशोक निंबाळकर