सोलापूर जिल्ह्यातील 11 नगरपरिषद आणि एका नगरपंचायतच्या निवडणुकीची रणधुमाळी आजपासून सुरू होणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील 289 जागांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरण्याला प्रारंभ होणार आहे. जिल्हा प्रशासनाकडून यंत्रणा सज्ज झालीय. जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा, सांगोला, करमाळा, बार्शी, कुर्डूवाडी, अक्कलकोट, मोहोळ, दुधनी, मैंदर्गी, अकलूज नगरपरिषद तर एक अनगर नगरपंचायत निवडणुका होणार आहेत.