जिल्हा परिषदेत 'लाचलुचपत'ची रेड! आरोग्यसेविका म्हणून नियुक्‍ती देण्यासाठी 'यांनी' घेतली 40 हजारांची लाच 

तात्या लांडगे
Monday, 27 July 2020

'लाचलुचपत'चे उपअधिक्षक श्री. पाटील म्हणाले... 

  • तक्रारदाराच्या पत्नीला हवी होती आरोग्यसेविका पदी नियुक्‍ती 
  • आरोग्यसेविका म्हणून तात्पुरती नियुक्‍ती देण्यासाठी मागितली होती 80 हजारांची लाच 
  • आरोग्यसेविका नियुक्‍तीची फाईल वरिष्ठांकडे पाठविण्यासाठी 40 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले 
  • जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागातील वरिष्ठ सहायक व कनिष्ठ प्रशासन अधिकारी ताब्यात 
  • दोघेही सेवानिवृत्तीच्या वाटेवर आहेत; अलिसाब रज्जाक शेख आणि कुमार नागप्पा बसमुंगे अशी आहेत त्यांची नावे 

सोलापूर : एका महिलेस आरोग्यसेविका म्हणून तात्पुरती नियुक्‍ती देण्याची फाईल वरिष्ठांकडे पाठविण्यासाठी लाच घेणाऱ्या जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील दोघांना आज लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले. कनिष्ठ प्रशासन अधिकारी अलिसाब रज्जाक शेख आणि वरिष्ठ सहायक कुमार नागप्पा बसमुंगे अशी त्यांची नावे आहेत. 

तक्रारदाराच्या पत्नीला आरोग्यसेविका म्हणून तात्पुरती नियुक्‍ती हवी होती. त्यासाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला, मात्र त्यांच्याकडे कोणी लक्ष दिले नाही. त्यावेळी आरोग्य विभागातील कनिष्ठ प्रशासन अधिकारी अलिसाब शेख आणि वरिष्ठ सहायक कुमार बसमुंगे यांनी तक्रादाराकडे 80 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. त्यातील अर्धी रक्‍कम फाईल वरिष्ठांकडे पाठविण्यासाठी देण्याचे ठरले. तर उर्वरित रक्‍कम काही दिवसांनी द्यायचे ठरले. त्यानुसार सोमवारी (ता. 27) 40 हजार रुपयांची लाच घेताना त्या दोघांनाही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधिक्षक संजीव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. 

'लाचलुचपत'चे उपअधिक्षक श्री. पाटील म्हणाले... 

  • तक्रारदाराच्या पत्नीला हवी होती आरोग्यसेविका पदी नियुक्‍ती 
  • आरोग्यसेविका म्हणून तात्पुरती नियुक्‍ती देण्यासाठी मागितली होती 80 हजारांची लाच 
  • आरोग्यसेविका नियुक्‍तीची फाईल वरिष्ठांकडे पाठविण्यासाठी 40 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले 
  • जिल्हा परिषदेतील आरोग्य विभागातील वरिष्ठ सहायक व कनिष्ठ प्रशासन अधिकारी ताब्यात 
  • दोघेही सेवानिवृत्तीच्या वाटेवर आहेत; अलिसाब रज्जाक शेख आणि कुमार नागप्पा बसमुंगे अशी आहेत त्यांची नावे 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bribery in solapur Zilla Parishad He took a bribe of Rs 40000 to be appointed as a health worker