
खासदार बृजभूषणसिंह म्हणतात, शरद पवार यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत
'जर शरद पवार मला भेटले तर, आदरानं त्यांना प्रणाम करणार'
मनसेच्या प्रवक्त्यांनी आज राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावर सापळा रचला असल्याचे आरोप केला आहे. आता या आरोपवर खासदार बृजभूषणसिंह यांनी सडेतोड प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत आणि आता ते जर मला भेटले तर नजर झुकवत नाही, आदरानं त्यांना प्रणाम करणार असल्याचे बृजभूषणसिंह जाहीर केलं आहे. एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही भूमिका मांडली आहे.
काय म्हणालेत खासदार बृजभूषणसिंह?
शरद पवार देशातील मोठ्या नेत्यांपैकी एक आहेत. मी कुस्तीचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे आणि पवार हे महाराष्ट्र कुस्ती संघटनेचे संरक्षक आहेत. तीन वर्षापूर्वी पुण्यात जो कार्यक्रमा झाला होता त्यावेळी शरद पवार, सुप्रिया सुळे यांनी आदराचं स्थान दिलं होती. कोणताही कार्यक्रम असो मला माळा घालायचे. त्यांनी एकही सत्काराचा हार स्वत:च्या हातात घेतला नाही. पवारांना वाटतं की कुस्ती क्षेत्रात जे काम झालं ते माझ्यामुळ झालं आहे. अशा अनेक कारणांमुळ मी वैयक्तिक त्यांचा आदर करतो असेही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
हेही वाचा: लोणावळ्यात बेपत्ता झालेल्या 'त्या' तरुणाचा आढळला मृतदेह
मागील काही दिवसांपूर्वीन मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी अयोध्या दौऱ्याची घोषणा केली होती. हिंदुत्वाची भूमिका घेऊन काढलेल्या या दौऱ्याला उत्तर प्रदेशातील भाजपाचे स्थानिक खासदार बृजभूषणसिंह यांनी विरोध केला होता. त्यामुळे राजकीय वातावरण तापलं होतं. आधी राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागावी आणि मग अयोध्येत पाऊल ठेवावे अशी मागणी बृजभूषणसिंह यांनी केली होती. दरम्यान, राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा रद्द झाल्यानंतर या दौऱ्याला विरोध हा ट्रॅप असून यासाठी महाराष्ट्रातून रसद पुरवली गेली असल्याचा आरोप राज ठाकरे यांनी केला होता.
आज सकाळपासून राष्ट्रवादी आणि मनसेत फोटोवॉर सुरु आहे. मनसेचे सचिन मोरे यांनी शरद पवार, बृजभूषण सिंह आणि सुप्रिया सुळे यांचे एका कार्यक्रातील फोटो शेअर करताना "कुछ फोटो अच्छे भी होते है.. और सच्चे भी होते है." असं म्हटलं होतं. यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकर यांनीही राज ठाकरे आणि शरद पवार यांचा फोटो शेअर केला आहे. काही फोटो चांगलेही असतात अन् खरेही, असे म्हणत त्यांनी मनसेला टोला लगावला आहे.
हेही वाचा: संभाजीराजेंचा पत्ता कट? संजय पवारांच्या नावावर शिवसेनेचं शिक्कामोर्तब
Web Title: Brij Bhushan Singh Says I Have Good Relation With Sharad Pawar Respect And Proud
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..