
MNS : बृजभूषण यांच्या मुद्द्यावर खळखट्याक मनसे बॅकफुटवर? राज ठाकरेंना डिवचूनही…
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दोऱ्याविरोधात भूमिका घेतलेले भाजपचे खासदार बृजभूषण सिंग हे १५ डिसेंबर रोजी महाराष्ट्रातील पुण्यात येत आहेत. या दरम्यान मनसे आणि बृजभूषण सिंह वाद पेटणार काय याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मनसेकडून त्यांच्या दोऱ्यावा विरोध केला जात नाहीय. यावर खासदार बृजभूषण सिंह यांनी पुणे दौऱ्याला मनसे विरोध करत नाहीये, ही चांगली गोष्ट असल्याचे म्हटले आहे.
पुण्यात महाराष्ट्र केसरी स्पर्धा ११ ते १४ जानेवारी दरम्यान होणार आहे, तर बक्षिस समारंभ १५ जानेवारीला होणार आहे. या कार्यक्रमासाठी बृजभूषण सिंह पुण्यात येणार आहेत.
महाराष्ट्रात येण्याबद्दल एका वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी सांगितलं की, महाराष्ट्रात जरूर येणार. महाराष्ट्राबद्दल मला खूप सम्मान आहे. छत्रपती शाहू माहाराजांनी कुस्तीसाठी स्टेडीयम बनवलं. देशात असं दुसरं उदाहरण सापडणार नाही. पाकीस्तानमधून पैलवान इथं येत होते, त्यांचा खर्च शाहू महाराज करत असतं. आजही ही परंपरा आहे की एखाद्या पैलवानाला वजन वाढवायचं असेल तर कोल्गापूरला जावं, ही परंपरा आता बंद झाली आहे, असे बृजभूषण सिंह म्हणाले.
हेही वाचा - Digital Rupee India : देशाचे नवे पर्यायी चलन ‘डिजिटल रुपी’
हेही वाचा: Maharashtra Kesari : पुण्यात होणार 'महाराष्ट्र केसरी'; शरद पवार-बृजभूषण यांची मध्यस्थी यशस्वी!
दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला कडाडून विरोध केल्यानंतर राज ठाकरे यांनी तो दौरा रद्द केला होता. यावरून राजकीय वातावरण तापलं होतं. त्यानंतर सोशल मिडीयावर बृजभूषण सिंह महाराष्ट्रात आल्यावर त्यांना धडा शिकवण्यात येईल अशी भूमिका मनसे कार्यकर्त्यांनी सोशल मिडीयावर घेतली होती. आता महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या निमित्ताने भाजप खासदार महाराष्ट्रात येत आहे, याबद्दल मनसेकडून तलवार म्यान केल्याचे दिसून येत आहे.
राज ठाकरे यांना विरोध तात्विक होता. राज ठाकरे यांच्या जागी जर मी असतो आणि मी त्यांना जी अट घातली होती की संताची, जनतेची किंवा पंतप्रधान, मुख्यमंत्र्याची कुणाची तरी माफी मागावी. कुठेतरी सांगा की माझ्याकडून चुक झाली आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
हेही वाचा: Gujarat Election Result : हार्दिक पटेलच्या निकालाचा दाखला अन् अजित पवारांचा शिंदे गटावर निशाणा; म्हणाले…
मनसे नेते वसंत मोरे काय म्हणाले
सध्या बृजभूषण सिंग यांना कोणताही विरोध करणार नाही अशी भूमिका मनसेने घेतली असून मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच यासंदर्भातले आदेश दिले असल्याचं मनसे नेते वसंत मोरे यांनी सांगितलं. तर मनसेने बृजभूषण यांच्या संदर्भात माघार घेतली का अशा चर्चा आता सुरू झाल्या असून वसंत मोरे यांनी यावर उत्तर दिलं आहे.
हेही वाचा: AAP : 'आप'ने करून दाखवलं! अवघ्या १० वर्षांत बनला 'राष्ट्रीय पक्ष'; जाणून घ्या काय आहेत नियम
"प्रकृती ठीक नसल्याने राज ठाकरे हे अयोध्येला गेले नव्हते. आमच्याही अंगाला माती लागलेली आहे. कुस्त्या कशा खेळायच्या ते आम्हालाही चांगल्या पद्धतीने माहिती आहेत पण आम्ही फक्त राज ठाकरे यांच्या आदेशामुळे शांत आहोत. राज ठाकरे जरी अयोध्येत गेले नसले तरी सुद्धा मनसैनिक यांनी त्याच दिवशी अयोध्येत जाऊन दर्शन घेतलं. मनसे कुणाच्या दावणीला बांधली गेली नाही. मनसेवर कोणाचेही बंधनं नाहीत" अशी माहिती मनसेचे पुण्यातील पदाधिकारी वसंत मोरे यांनी दिली आहे.