Gujarat Election Result : हार्दिक पटेलच्या निकालाचा दाखला अन् अजित पवारांचा शिंदे गटावर निशाणा; म्हणाले…

Gujarat Election Result 2022 ajit pawar statement on bjp hardik patel eknath shinde faction politics news
Gujarat Election Result 2022 ajit pawar statement on bjp hardik patel eknath shinde faction politics news esakal

गुजरात विधानपरिषद निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत, या निवडणुकीत भाजप १५० पेक्षा जास्त जागा जिंकत एतिहासिक विजय मिळवला आहे . दरम्यान गुजरातमधील भाजपाच्या या दणदणीत विजयानंतर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते अजित पवार यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे.

हार्दिक पटेल हा मागं होता, पराभूत होईल का काय अशी परिस्थिती होती. निवडणुकीत त्याच्या भोवती एक वलय निर्माण झालं होतं. पण पक्ष बदलल्यानंतर त्याला मतदारांकडून फार प्रतिसाद मिळाल्याचं दिसत नाही. तसं असतं तर तो सुरुवातीलाच निवडणून आला असता, त्याच्यावर मागं पडण्याची वेळ आली नसती असे पवार म्हणाले. तसेच निवडणूक आयोगाकडून सर्व आकडेवारी समोर आल्यानंतर याचं बारीक विश्लेषण करता येईल, असे अजित पवार म्हणाले.

हेही वाचा - Moonlighting And Tax Benefits : ‘मूनलायटिंग’च्या वाटे, नको ‘टॅक्स’चे काटे!

बंड करून वेगळे झालेल्या शिंदे गटातील नेत्यांना आगामी निवडणुकीत अडचणींचा सामना करावा लागेल असं वाटतं का असे विचारले असता अजित पवार म्हणाले की, मी आधी देखील सागितलं आहे, बाळासाहेब ठाकरे हयात असताना शिवसेनेत जेव्हा फूट पडली ज्या नेत्यांनी १७-१८ आमदार घेऊन शिवसेना सोडली त्या सगळ्यांचं पानिपत झाल्याचं उभ्या महाराष्ट्रानं पाहिलं आहे. हा मुद्दा मी सभागृहात सांगितला होता. माझा अंदाज आहे की, शिवसेनेचा मतदार हा उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे उमेदवारांच्या पाठिशी उभा राहिल. मी ज्योतिषी नाही. तसेच घोडामैदान लांब नाही जेव्हा निवडणुका लागतील तेव्हा चित्र स्पष्ट होईल असे अजित पवार म्हणाले.

Gujarat Election Result 2022 ajit pawar statement on bjp hardik patel eknath shinde faction politics news
Delhi MCD Results : दिल्लीत ओवेसींच्या AIMIMला 'नोटा'नेही पछाडलं, अन् केजरीवालांना…

गुजरात निवडणुकीमध्ये आप आणि कॉंग्रेस हे दोघं वेगवेगळे लढले, यावेळी या दोन पक्षांना मिळालेल्या मतांची टक्केवारी पाहावी लागेल. आप फार तर एक आकडी जागा मिळवेल आणि त्याचा फटका कॉंग्रेसला बसेल अशी विश्लेषकांची भूमिका होती, त्यांची अपेक्षा पुर्ण झाली. हिमाचलप्रदेशमध्ये कॉंग्रेस आली. दिल्ली महापालिकेत १७ वर्षांनंतर आपने भाजपकडून ताब्यात घेतली. सध्या समिश्र निकाल लागले. पण ज्या राज्यात पोटनिवडणुका झाल्या तेथे मात्र मोठ्या प्रमाणात भाजपला यश मिळालेलं नाही, असे अजित पवार म्हणाले.

Gujarat Election Result 2022 ajit pawar statement on bjp hardik patel eknath shinde faction politics news
FIFA World Cup 2022 : कतारमध्येही CM शिंदेंचा डंका! बाळासाहेबांच्या शिवसेनेचा फोटो होतोय व्हायरल

तरी देखील लोकशाहीमध्ये यश अपयश असतं, जे निवडून आले आहेत त्यांचं आभिनंदन आणि ज्यांचा पराभव झाला त्यांनी खचून जावू नका, नाउमेद होऊ नका पुन्हा जोमाने कामाला लागा असा सल्ला देखील अजित पवार यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com