Budget Session 2023 : सभागृहात लक्षवेधी लागली की संबंधित व्यक्ती मला...;नीलम गोऱ्हेंची धक्कादायक माहिती | Budget session maharashtra assembly 2023 Neelam gorhe raised a concern maharashtra politics | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ahmednagar News, Neelam Gorhe News
Budget Session 2023 : सभागृहात लक्षवेधी लागली की संबंधित व्यक्ती मला...;नीलम गोऱ्हेंची धक्कादायक माहिती

Budget Session 2023 : सभागृहात लक्षवेधी लागली की संबंधित व्यक्ती मला...;नीलम गोऱ्हेंची धक्कादायक माहिती

महाराष्ट्राचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. या अधिवेशनादरम्यान आता विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी धक्कादायक बाब उघड केली आहे. लक्षवेधी लागू नये म्हणून अनेकजण गळ घालत असल्याची बाब त्यांनी समोर आणली आहे.

सभागृहात लक्षवेधी लागल्यावर त्या विषयाशी संबंधित व्यक्ती आपल्याला भेटायला येत असल्याचं गोऱ्हे यांनी निदर्शनास आणलं आहे. अधिवेशन सुरू असताना आमदारांच्या मार्फत या व्यक्ती विधान भवन परिसरात येतात आणि आमदारांच्या सोबत आपली भेट घेण्याचा प्रयत्न करतात, असंही गोऱ्हे म्हणाल्या. हे होणं योग्य नाही, असं सांगत त्यांनी आमदारांना तंबी दिली आहे.

इथून पुढे अशाप्रकारे कोणीही आलेलं चालणार नाही, असा स्पष्ट इशारा नीलम गोऱ्हे यांनी दिला आहे. लक्षवेधी लागू नये यासाठी गळ घातली जात असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

नुकतंच खासगी सावकार प्रकरणात एक आमदार ज्या सावकाराविरोधात लक्षवेधी लागली होती. त्यांना घेऊन माझ्या दालनात आले होते. आणि धक्कादायक बाब म्हणजे त्याच्यासोबत संबंधित प्रकरणाचा अधिकारी देखील उपस्थित होता, असं गोऱ्हे यांनी सांगितलं.