Maharashtra Budget Session: काळजी करु नका...CM शिंदेंनी संतापलेल्या अजित पवारांना दिले उत्तर

अवकाळी पावसाने शेतपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
Maharashtra Budget Session
Maharashtra Budget Session

राज्यात गेले काही दिवसांपासून अवकाळी पावसाने शेतपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. त्याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षाच्या वतीने विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आक्रमक भूमिका घेत राज्य सरकारवर निशाणा साधला. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काळजी करु नका हे सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. असे उत्तर दिलं.

अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा तिसऱ्या आठवड्यातील पाचवा दिवस आहे. यावेळी अजित पवार यांनी कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांबाबत केलेल्या विधानावर संताप व्यक्त केला. तसेच मुख्यमंत्री शिंदेंवरही हल्लाबोल केला.

Maharashtra Budget Session
Budget Session 2023 : सभागृहात लक्षवेधी लागली की संबंधित व्यक्ती मला...;नीलम गोऱ्हेंची धक्कादायक माहिती

काय म्हणाले अजित पवार?

अवकाळी पावसाने आंबा, द्राक्ष, केळी, संत्री यांचं नुकसान होत आहे. अनेक जिल्ह्यात अवकाळी पाऊस सुरु होईल, असं सांगितलं जात आहे. तरी, सरकार संवेदनशील आहे का माहिती नाही. शेतीचं फार नुकसान झालं नाही, असे तारे अब्दुल सत्तार यांनी तोडले आहेत.

राज्याचे मुख्यमंत्री सर्वांचे फोन उचलतात, असे व्हिडीओ फिरतात. तर, त्यांचे मंत्री अशाप्रकारे शेतकऱ्यांची कुचेष्टा करतात, अशी संतप्त भावना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.

त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भूमिका मांडली.

वाचाळ मंत्री शेतकऱ्यांची कुचेष्टा करतात. कसं चालेल? आम्हीही शेतकऱ्यांचं प्रतिनिधीत्व करतो. सरकारने तातडीने पंचनामे करून मदत केली पाहिजे. हातातोंडाशी आलेला पिक जर शेतकऱ्यांचं गेलं, तर शेतकऱ्यांनी न्याय मागायचं कुणाला? शेतकऱ्यांनी पाहायचं कुणाकडे? यंत्रणा हलायला हवी होती."

"संप असल्याने तृतीय आणि चतुर्थ श्रेणी कर्मचारी जात नाही. शेतकरी हवालदिल झाला आहे. असं झाल्यावर तो बिचारा आत्महत्येपर्यंत मजल मारतो.

आत्महत्या करण्यापर्यंत तो प्रवृत्त होतो. माझी हात जोडून विनंती आहे की, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी हे गांभीर्य घेण्याची गरज आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना केलेली मदत तुटपुंजी आहे. शेतकरी जगाला तर राज्य जगेल", असं विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.

Maharashtra Budget Session
Maharashtra Weather update: आणखी पाच दिवस राज्यात पावसाचा अलर्ट; गारपिटीचा इशारा...

शिंदे काय म्हणाले?

मी नांदेडच्या कलेक्टरची स्वतः बोलो आहे. तिथे पंचनामा सुरु आहे. नाशिक येथील कलेक्टरसोबतही माजी चर्चा झाली आहे. त्यांच्याही माझी चर्चा झाली आहे. अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे झालेलं हे नुकसान त्याचेही पंचनामे जवळपास झाले आहेत.

शेतकऱ्यांच्या मागे उभे आहोत. आजही आम्ही मदत करतोय. हे शेतकऱ्याचे सरकार आहे. नियम निकष डावलून शेतकऱ्यांना मदत करण्यात आली आहे. त्यामुळे काळजी करुन नका. शेतकऱ्याला हे सरकार वाऱ्यावर सोडणार नाही. अशी ग्वाही शिंदे यांनी यावेळी दिली.

Maharashtra Budget Session
कृषी मंत्र्याच्या मतदारसंघात शेतकऱ्याची फसवणूक! सूर्यफूल बियाणे उगवलेच नाही | Fraud with Farmer

राज्यात पुढील 2 ते 3 दिवस गडगडाटासह पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला असून खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मुंबईसह पुणे, ठाणे, पालघर, नाशिक, कोल्हापूर, नंदूरबार, विदर्भ, मराठवाडा, चंद्रपूर, नागपूर, अमरावती, बुलढाणा, जळगाव, छत्रपती संभाजीनगर आदी भागांत पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com