
बुलढाण्यात मंगळवारी पहाटे भीषण अपघात झाला असून यात तिघांचा जागीच मृत्यू झालाय. तर चौघे जण गंभीर जखमी झाले आहेत. नांदुरा शहरात हा अपघात झाला आहे. जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समजते. बुलढाण्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ वर ट्रक आणि कारची धडक झाली.