
ओला, उबरसह इतर कंपन्यांना हायकोर्टाचा निर्वाणीचा इशारा
मुंबई : ओला, उबरसह इतर टॅक्सी कंपन्यांना हायकोर्टाने निर्वाणीचा इशारा दिला असून, कॅब अॅग्रीगेटरना 16 मार्चपर्यंत राज्य सरकारसमोर मोटर वाहन कायद्यांतर्गत त्यांच्या टॅक्सी चालवण्याच्या परवान्यासाठी अर्ज करण्याचे निर्देश दिले आहेत. (Bombay High Court On Aggregators License)
हेही वाचा: OBC Reservation : ओबीसी आरक्षणाचं विधेयक विधानसभेत मंजूर
महाराष्ट्र सिटी टॅक्सी अधिनियमाअंतर्गत अॅप आधारित टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपन्यांना बंधनकारक असलेला शहरात वाहन चालवण्याचा परवाना नसल्याची मुंबई उच्च न्यायालयाने दखल घेत वरील निर्देश दिले आहेत. यावेळी अॅप आधारित सगळ्या टॅक्सी कंपन्या परवान्याशिवाय चालवल्या जात असल्याने उच्च न्यायालयाकडून याबाबत विचारणा देखील करण्यात आली आहे. (Ola Uber Taxi Service)
हेही वाचा: पुण्याच्या केक बेकरचे एक नव्हे दोन World Record, वाचा आता काय केलं
उबर इंडियाने काय म्हटले होते
दरम्यान, याबाबत उबर इंडियने महाराष्ट्रात परवान्यासाठी अर्ज करण्याकरिता कोणतेही नियम किंवा मार्गदर्शक तत्त्वे नसल्याचे म्हणत, अन्य अॅप आधारित टॅक्सी सेवा देणाऱ्या इतर कंपन्यांनीही शहरात वाहन चालवण्यासाठी आवश्यक परवाना घेतला नसल्याचा दावा उबर इंडियाने केला होता.
हेही वाचा: चीनचे झेंडे लावा अन् रशियावर बॉम्ब फेका; ट्रम्प यांचा अजब सल्ला
महाराष्ट्रात परवान्यासाठी अर्ज करण्याची पद्धत किंवा प्रक्रिया दर्शवणारे कोणतेही नियम किंवा मार्गदर्शक तत्त्वे नसल्याचे उबरने म्हटले होते. तसेच परवाना मंजूर करण्याच्या अटींबाबत कोणतीही स्पष्टता नसल्याचाही दावा उबर इंडियाने करत आजपर्यंत राज्य सरकारने मोटार वाहन कायद्यांतर्गत कोणतेही नियम अधिकृतपणे प्रसिद्ध केलेले नसल्याचे म्हटले होते.
Web Title: Cab Aggregators To Apply For License Before March 16 Says Bombay High Court
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..