चीनचे झेंडे लावा अन् रशियावर बॉम्ब फेका; ट्रम्प यांचा अजब सल्ला

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या विविध वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहिलेले आहे.
डोनाल्ड ट्रम्प
डोनाल्ड ट्रम्पSakal

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे त्यांच्या राष्ट्राध्यक्ष पदावर असताना विविध वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहिलेले आपण पाहिले आहे. एवढेच काय तर, आता राष्ट्राध्यक्ष पद गेल्यानंतरही ट्रम्फ त्यांच्या विविध कृतींमुळे आणि वक्तव्यामुळे चर्चेत राहत आहेत. दरम्यान, ट्रम्फ यांनी रशिया आणि युक्रेन (Russia Ukraine War) यांच्यात सुरु असलेल्या युद्धदरम्यान पुन्हा एकदा मोठे विधान केले असून, यावेळी त्यांनी चक्क अमेरिकेने F-22 लढाऊ विमानांवर चीनचे झेंडे लावून रशियावर बॉम्ब टाकण्याचाच सल्ला दिला आहे. ते रिपब्लिकन राष्ट्रीय समितीच्या कार्यक्रमात ते बोलत होते. याबद्दल हिंदुस्तान टाईम्सने वृत्त प्रकाशित केले आहे. (US Former President Donald Trump)

डोनाल्ड ट्रम्प
नवाब मलिकांना दिलासा नाहीच; १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी

रशियाने युक्रेनमध्ये केलेल्या आक्रमणानंतर ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन (Putin) यांची प्रशंसा केली होती, त्यानंतर रिपब्लिकन पक्षाने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आपल्या भूमिकेत बदल करत ट्रम्प यांनी बायडेन यांच्यावर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेने F-22 या लढाऊ विमानांवर चीनचे झेंडे लावून रशियावर बॉम्ब फेकावे. यानंतर हे कृत्य चीनने केले सांगत दोन्ही देशांमध्ये सुरू झालेले भांडण बघत बससण्याचे काम करायचे असा अजब सल्लाच ट्रम्फ यांनी दिला आहे. विशेष म्हणजे चीनचे झेंडे लावून बॉम्ब फेका या विधानानंतर उपस्थित प्रेक्षक टाळ्या वाजवत होते, असे वृत्त युएस मीडियाने दिले आहे.

डोनाल्ड ट्रम्प
MRF Tyres : मुलांसाठी फुगे ते देशातील नंबर वन टायर उत्पादक

रशियाने युक्रेनमध्ये केलेल्या आक्रमणानंतर ट्रम्प यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची प्रशंसा केली होती, त्यानंतर रिपब्लिकन पक्षाने नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर आपल्या भूमिकेत बदल करत ट्रम्प यांनी बायडेन यांच्यावर हल्लाबोल करण्यास सुरुवात केली आहे.

यावेळी ट्रम्प यांनी नाटोवर हल्लाबोल करत नाटो म्हणजे पेपरवरील वाघ असे संबोधल आहे. तसेच "देश कोणत्या मुद्द्यावरून देश आम्ही मानवतेविरुद्धचा हा मोठा गुन्हा स्वीकारू शकत नाही? आम्ही ते होऊ देऊ शकत नाही. आम्ही ते होऊ देऊ शकत नाही असं म्हणत आहेत”. असल्याचा प्रश्नही त्यांनी उपस्थित करत बायडेन यांनी अशा प्रकारची वक्तव्य करणे थांबवले पाहिजे असे सांगत हे प्रत्येकान ऐकणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com