महिला मंत्री नसल्याची खंत - सुप्रिया सुळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

cabinet expansion supriya sule criticize shinde fadanvis govt bjp shiv sena maharashtra politics mumbai

महिला मंत्री नसल्याची खंत - सुप्रिया सुळे

मुंबई : शिंदेसरकारच्या मंत्रीमंडळात महिलांना योग्य ते प्रतिनिधीत्व मिळेल अशी अपेक्षा होती परंतु एकाही महिलेला संधी मिळाली नाही. हे अतिशय खेदजनक असून राज्याच्या स्त्री-शक्तीवर हा अन्याय आहे अशी थेट टिका राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत केली आहे. आज 39 दिवसानंतर शिंदेसरकारच्या 18 लोकांनी मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी पंतप्रधानांच्या वक्तव्याची आठवण भाजपला करुन दिली आहे.

स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देशाच्या प्रगतीसाठी स्त्री-सक्षमीकरण आवश्यक असल्याचे सांगतात. त्यासाठी त्या केवळ 'होम मेकर' असू नयेत तर त्या 'नेशन बिल्डर' असाव्यात असं ते सांगतात मात्र आज राज्यात मंत्रीमंडळाच्या झालेल्या शपथविधीत १८ मंत्र्यांनी शपथ घेतली त्यात महिलांना प्रतिनिधीत्त्व देण्यात आले नाही याबाबत खासदार सुप्रियाताई सुळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

Web Title: Cabinet Expansion Supriya Sule Criticize Shinde Fadanvis Govt Bjp Shiv Sena Maharashtra Politics Mumbai

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..