

devendra fadnavis ajit pawar eknath shinde
esakal
Devendra Fadnavis: राज्यात नुकत्याच झालेल्या नगरपरिषदा आणि नगरपंचायतीमध्ये अध्यक्ष म्हणून थेट जनतेतून निवडून आलेल्या अध्यक्षास, जर त्याच निवडणुकीत तो सदस्य म्हणून निवडून आला असेल, तर त्याला एकाचवेळी तर दोन्ही पदांवर राहता येणार आहे. याबाबतचा महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियमात सुधारणा करण्यासाठी लवकरच अध्यादेश काढण्यात येणार आहे. बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला.