
महायुतीला प्रचंड बहुमत मिळाल्यानंतर राज्यात फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं. सुरुवातीला मंत्र्यांचा शपथविधी झाला पण खातेवाटप झालं नव्हतं. त्यानंतर आता सहा महिन्यांचा कालावधी उलटला तरी राज्यमंत्र्यांना त्यांच्या अधिकारांचं वाटप झालेलं नाही. महायुतीत राज्यमंत्र्यांमध्ये यामुळे नाराजीचं वातावरण आहे. काही राज्यमंत्र्यांनी याबाबत थेट मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केल्याची माहिती आता समोर येत आहे.