
मुंबई - राज्यातील महायुती सरकारच्या मंत्रिमंडळामध्ये युवा जोश दिसणार असून कलंकित चेहऱ्यांना या मंत्रिमंडळापासून जाणीवपूर्वक दूर ठेवले जाण्याची शक्यता आहे. हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला शपथविधी करूनच सरकारच्या चहापान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे.