मुंबई - राज्यात दरवर्षी वाढणारी कर्करुग्णांची संख्या, उपचारासाठी होणारी फरपट थांबवण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाने राज्यात ‘आसाम कॅन्सर केअर’ प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेतला आहे. .राज्यातील जवळपास सर्वच जिल्ह्यांतील ३६ वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये कर्करोगावर उपचार करण्यात येणार आहेत. या प्रकल्पासाठी पाच हजार कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्याबाबतचा प्रस्ताव वैद्यकीय शिक्षण विभागाने मंत्रिमंडळाकडे सादर केला आहे.राज्यात २०२० मध्ये एक लाख १६ हजार १२१ कर्करुग्ण होते. ही संख्या २०२४ मध्ये एक लाख २७ हजार ५१२ एवढी वाढली आहे. पाच वर्षांत सुमारे ११ हजार ३९१ नवीन रुग्णांची भर पडली आहे. देशात कर्करुग्ण संख्येत उत्तर प्रदेशानंतर महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक लागतो..राज्यात सध्या मुंबईतील टाटा कर्करोग रुग्णालयातच आवश्यक सर्व उपचार होत आहेत. मात्र मोठी रुग्णसंख्या पाहता आणखी रुग्णालयांची आवश्यकता आहे. यासाठीच सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी निगडित असणाऱ्या रुग्णालयांमध्ये कर्करोगावर उपचार होणार आहेत.छत्रपती संभाजीनगर, कोल्हापूर, चंद्रपूर, नागपूर, मुंबई, पुणे, धुळे, नांदेड व अकोला येथील नऊ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न रुग्णालयात ‘एल २’ स्तरावरील उपचार केले जाणार आहेत. ‘एल ३’ अंतर्गत २७ रुग्णालयांचा समावेश आहे..‘आसाम कॅन्सर केअर’ प्रकल्पआसाम सरकार आणि टाटा ट्रस्ट यांच्या वतीने ‘आसाम कॅन्सर केअर’ प्रकल्पाचा विकासकर्करोगाच्या उपचारांसाठी उत्तम, परवडणाऱ्या व्यवस्थेची उभारणीघराच्याजवळ उपचार उपलब्ध, राज्यभर तीन स्तरीय व्यवस्थाकर्करोगाचे निदान, उपचार आणि पुनर्वसन सेवा एकाच ठिकाणीयाच धर्तीवर महाराष्ट्रात कर्करुग्णांवर उपचार करण्यात येणार आहेत.राज्याच्या कानाकोपऱ्यात कर्करोगावर उपचार होणार असल्याने रुग्णांना मोठ्या शहरात जाऊन, लाखो रुपये खर्च करण्याची वेळ येणार नाही. या महत्वकांक्षी प्रकल्पाला राज्य मंत्रिमंडळाची लवकरच मंजुरी मिळेल.- हसन मुश्रीफ, वैद्यकीय शिक्षण मंत्री.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.