Loksabha 2019 : नवख्या उमेदवारांना शिकवणी 

तात्या लांडगे
सोमवार, 8 एप्रिल 2019

उमेदवारांकडेही नाहीत विकासाचे मुद्दे 
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बहुतांश उमेदवार विकासाच्या मुद्‌द्‌यांवर बोलताना दिसत नाहीत. आगामी काळात काय करणार, याबाबत बोलण्यापेक्षा आपण खासदार असताना अथवा जिल्हा परिषद अध्यक्ष असताना काय कामे केली, याबाबतच प्रचार केला जातोय. सोलापूरसह अन्य जिल्ह्यांत दर्जेदार उच्च शिक्षणाची सोय नसल्याने तरुणांचे स्थलांतर वाढले आहे. उच्च शिक्षणानंतर उद्योग, व्यवसाय, नोकरीची संधी नाहीत. शहरासह ग्रामीण भागात नागरिकांना पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळत नाही, पाण्याअभावी अनेक उद्योग अडचणीत असून नवे उद्योग आले नाहीत. विमानसेवा सुरळीत नसल्याने उद्योजकांची नाराजी आहे. शेती अडचणीत असून शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. सोलापूरचा वस्त्रोद्योग अडचणीत असून विडी कामगार व यंत्रमाग कामगारांचे प्रश्‍न कायम आहेत. त्यावर कोणीच बोलताना दिसत नसल्याचे चित्र आहे.

सोलापूर : लोकसभेच्या माध्यमातून निवडणुकीच्या रणांगणात उतरलेल्या नवख्या उमेदवारांना पक्षश्रेष्ठींकडून शिकवणी लावल्याचे चित्र पहायला मिळत आहे. याची जबाबदारी इच्छुक असूनही उमेदवारी न मिळालेल्यांवर आणि पक्षातील सुशिक्षित तरुणांवर सोपविली आहे. त्यांच्याकडून उमेदवारांना संबंधित विधानसभा मतदारसंघाचे प्रश्‍न, निवडून आल्यानंतरचा विकासाचा अजेंडा असे मुद्दे प्रचारासाठी दिले जात आहेत. एकमेकांवर टीका करण्याऐवजी विकासावर बोला, अशा सूचना पक्षश्रेष्ठींनी उमेदवारांना दिल्याचे सूत्रांनी सांगितले. 

लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदारसंघाचे प्रश्‍न, लोकांना अपेक्षा काय आहेत. भाजप सरकारने मागील साडेचार वर्षांत कोणत्या योजना राबविल्या, आगामी काळात काय केले जाईल, याची संपूर्ण माहिती नसलेल्या उमेदवारांना प्रचाराचा मुद्दे देण्याकरिता स्वतंत्र टीम नियुक्‍त करण्यात आल्या आहेत. त्या तरुणांना सोबत घेऊनच उमेदवार प्रचाराला बाहेर पडत असल्याचे चित्र पाहण्यात येत आहे. त्यामुळे नवख्या उमेदवारांची सोय झाली आहे. आगामी काळात काय करणार हे सांगण्यापेक्षा मला निवडून द्या, तुमचा विकास करतो, असाच प्रचार करत ते फिरत होते. दरम्यान, या पार्श्‍वभूमीवर युती असो की आघाडी पक्षाच्या उमेदवारांसाठी पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी ही नवी शक्‍कल लढविल्याने प्रचारात रंगत आल्याचे चित्र आहे. 

उमेदवारांकडेही नाहीत विकासाचे मुद्दे 
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत बहुतांश उमेदवार विकासाच्या मुद्‌द्‌यांवर बोलताना दिसत नाहीत. आगामी काळात काय करणार, याबाबत बोलण्यापेक्षा आपण खासदार असताना अथवा जिल्हा परिषद अध्यक्ष असताना काय कामे केली, याबाबतच प्रचार केला जातोय. सोलापूरसह अन्य जिल्ह्यांत दर्जेदार उच्च शिक्षणाची सोय नसल्याने तरुणांचे स्थलांतर वाढले आहे. उच्च शिक्षणानंतर उद्योग, व्यवसाय, नोकरीची संधी नाहीत. शहरासह ग्रामीण भागात नागरिकांना पिण्यासाठी पुरेसे पाणी मिळत नाही, पाण्याअभावी अनेक उद्योग अडचणीत असून नवे उद्योग आले नाहीत. विमानसेवा सुरळीत नसल्याने उद्योजकांची नाराजी आहे. शेती अडचणीत असून शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. सोलापूरचा वस्त्रोद्योग अडचणीत असून विडी कामगार व यंत्रमाग कामगारांचे प्रश्‍न कायम आहेत. त्यावर कोणीच बोलताना दिसत नसल्याचे चित्र आहे.

Web Title: candidates learning speech style for Loksabha election