Medical Careers Courses: मेडिकल क्षेत्रात करिअर करायचे? विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी होमिओपॅथी, आयुर्वेद सह अन्य कोर्से आहेत बेस्ट!

Top Medical Career Courses : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने २०२५ सालचा बारावीचा निकाल जाहीर केला आहे. विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांसाठी वैद्यकीय क्षेत्रात करिअरच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत
Top Medical Career Courses
Top Medical Career Courses Esakal
Updated on

Top Medical Career Courses : इयत्ता बारावीच्या निकालानंतर विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना मेडिकल क्षेत्रात करिअरच्या खूप मोठ्या संधी आहेत. ज्यांना मेडिकल क्षेत्रातून डॉक्टर बनायचे आहे, रुग्णसेवा करायची आहे, समाजातील लोकांची मदत करायची आहे आणि समाजात आपले स्वतःचे एक आदरणीय स्थान निर्माण करायचे असलेल्यांना हे क्षेत्र महत्त्वाचे आहे.

Top Medical Career Courses
Careers After 12th science: बारावीला सायन्स घेतलं होतं ? प्रत्येक ग्रुपच्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत 'हे' करिअर ऑप्शन्स!

मेडिकल क्षेत्रात करिअर करण्यासाठी अनेक कोर्सेस आहेत. तसेच अनेक ऑप्शन देखील आहेत. यात होमिओपॅथी, ॲलोपॅथी तसेच आयुर्वेद, असे अनेक पर्याय असून त्यासाठी विज्ञान शाखेची निवड करताना ‘पीसीबी’ (फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी) ग्रूप घ्यावा लागतो.

‘या’ कोर्समधून करिअरची अशी संधी

1. एमबीबीएस

या कोर्सला मेडिकल क्षेत्रात महत्त्वाचे स्थान असून हा कोर्स करण्यासाठी बारावात विज्ञान शाखेतून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. ‘पीसीबी’ या विषयातील अभ्यासक्रम पूर्ण असणे आवश्यक आहे. या कोर्सची मुख्य परिक्षा ’NEET’ असते आणि त्यात चांगल्या गुणाने उत्तीर्ण होऊन गुणवत्ता यादीत येणाऱ्यांना प्रवेश मिळतो. या कोर्सचा कालावधी साडेपाच वर्षांचा आहे. इंटर्नशिप एक वर्षाची असते. या कोर्ससाठी साधारणत: चार ते १५ लाखांचा खर्च होतो.

2. बीएचएमएस

आजकाल होमिओपॅथी औषधांना जास्त पसंती दाखवली जाते. होमिओपॅथी औषधांमुळे शरीरावर होणारे परिणाम कमी होतात म्हणून या कोर्सला मेडिकल क्षेत्रात महत्त्वाचे स्थान आहे. कोर्स करण्यासाठी बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. कोर्सची मुख्य परिक्षा ‘NEET’ या विभागाने घेतली जाते. हा कोर्स साडेपाच वर्षांचा असून एक वर्षाची इंटर्नशिप आहे. या कोर्ससाठी ८० हजार ते दीड लाख रुपयांचा खर्च होतो.

3. बीएएमएस

आयुर्वेदिक औषधांना जास्त पसंती दाखवली जाते. आयुर्वेदिक औषधांमुळे शरीरावर होणारे परिणाम कमी असतात म्हणून या कोर्सला मेडिकल क्षेत्रात महत्त्वाचे स्थान आहे. हा कोर्स करण्यासाठी बारावी विज्ञान शाखेतून उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. बीएएमएस कोर्सची मुख्य परिक्षा ‘NEET’ या विभागाने घेतली जाते. या कोर्स साडेपाच वर्षांचा असतो आणि इंटर्नशिप वर्षांची असते.

4. बीपीटी

या कोर्सलाही चांगल्याप्रकारे पसंती मिळत असून मेडिकल क्षेत्रात याला महत्वाचे स्थान आहे. हा कोर्स करण्यासाठी विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारची एंट्रन्स एक्झाम देण्याची गरज लागत नाही. हा एक पॅरामेडिकल कोर्स आहे, पण त्यासाठी महाविद्यालय स्तरावर परिक्षा घेतली जाते. विज्ञान शाखेतून बारावी उत्तीर्ण असलेल्या ‘पीसीबी’ ग्रूपच्य विद्यार्थ्यांना यातून प्रवेश मिळतो. या कोर्सची मुख्य परिक्षा घेतली जात नाही, परंतु महविद्यालयस्तरावर परिक्षा होते. हा कोर्स चार वर्षांचा असून सहा महिन्यांची इंटर्नशिप आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com