काळजीवाहू राज्य सरकारला महाराष्ट्राचीच काळजी नाही - बाळासाहेब थोरात

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 5 नोव्हेंबर 2019

राज्यात काळजीवाहू सरकार आहे. मात्र या सरकारला महाराष्ट्राचीच काळजी नाही.  खोटी आश्वासने देण्यापलीकडे हे सरकार काहीच करत नसल्याची टिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी (ता.५) राज्य सरकारवर केली. संकटाच्या काळात सरकारने भक्कमपणे शेतकऱ्यांच्या मागे उभं राहण्याची गरज असून पावसामुळे पीक वाया गेलेल्या शेतक-यांना नुकसानभरपाई म्हणून प्रति हेक्टरी ५० हजार रू. व फळबागांना प्रति हेक्टरी १ लाख रुपये मदत करावी, अशी मागणीही  थोरात यांनी केली आहे.

पुणे - राज्यात काळजीवाहू सरकार आहे. मात्र या सरकारला महाराष्ट्राचीच काळजी नाही.  खोटी आश्वासने देण्यापलीकडे हे सरकार काहीच करत नसल्याची टिका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मंगळवारी (ता.५) राज्य सरकारवर केली. संकटाच्या काळात सरकारने भक्कमपणे शेतकऱ्यांच्या मागे उभं राहण्याची गरज असून पावसामुळे पीक वाया गेलेल्या शेतक-यांना नुकसानभरपाई म्हणून प्रति हेक्टरी ५० हजार रू. व फळबागांना प्रति हेक्टरी १ लाख रुपये मदत करावी, अशी मागणीही  थोरात यांनी केली आहे.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या संयुक्त शिष्टमंडळाने आज राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांची भेट घेऊ घेऊन पावसामुळे झालेल्या नुकसानीची माहिती दिली व शेतक-यांना तात्काळ मदत करावी, अशी मागणी संयुक्त निवेदनाद्वारे राज्यपालांकडे केली आहे.

या शिष्टमंडळात माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसच्या प्रदेश कार्याध्यक्ष यशोमती ठाकूर, आमदार अमित देशमुख, धीरज देशमुख, खासदार सुनील तटकरे, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड,  शरद रणपिसे, हुस्नबानू खलिफे, माजी आमदार मोहन जोशी आदी उपस्थित होते.

थोरात म्हणाले, "महापूरबाधित लोकांसाठी ६८०० कोटी रुपयांच्या मदतीची घोषणा सरकारने केली होती. पण ती मदत अद्याप मिळालेली नाही. आता सरकारने दहा हजार कोटींची मदत जाहीर केली आहे. पण ती कधी मिळणार? हे माहित नाही. 

महाराष्ट्रात जुलै ते ऑक्टोबर 2019 या कालवधीत पडलेला पाऊस हा गेल्या चाळीस ते पंचेचाळीस वर्षातील उच्चांकी पाऊस आहे. या अतिवृष्टीमुळे शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. प्रामुख्याने खरीप हंगामातील कापूस, भात, सोयाबीन, मका, तूर, ज्वारी, बाजरी, भुईमूग, धान, कांदा या प्रमुख पिकांसह कडधान्यांचे पीक उद्ध्वस्त झाले आहे. याबरोबरच बागायती पिके, फळबागा आणि फुलशेतीसह भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचे प्रचंड मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Caretaker state government does not care about Maharashtra balasaheb thorat