Sanjay Raut : राऊतांच्या अडचणीत वाढ? CM शिंदेंबोबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल case file against Thackrey group mp Sanjay raut for using offensive words about CM Eknath shinde | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sanjay Raut

Sanjay Raut : राऊतांच्या अडचणीत वाढ? CM शिंदेंबोबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी गुन्हा दाखल

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. खासदार संजय राऊत यांच्याविरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमित शाहांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरती आक्षेपार्ह भाषेत टीका केल्याप्रकरणी शिंदे गटाचे नेते योगेश बेलदार यांच्या तक्रारीवरून नाशिकच्या पंचवटी येथील पोलीस ठाण्यात राऊत यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संजय राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबात आक्षेपार्ह भाषेत वक्तव्य केलं होतं. याप्रकरणी नाशिकमधील पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासारख्या व्यक्तीच्या आणि मुख्यमंत्री पदाची बदनामी केल्याप्रकरणी राऊतांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. शिवसेनेतील बंडानंतर ठाकरे गटातून शिंदें गटात गेलेले नेते योगेश बेलदार यांनी राऊतांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर राज्यभरात मोठा संघर्ष दिसून येत आहे. सध्या संपूर्ण राज्यभरात शिंदे गट विरुद्ध ठाकरे गट असा संघर्ष दिसून येत आहे. अशातच नशिकमध्येही ठाकरे आणि शिंदे गट यातील संघर्ष वाढला आहे. शिवसेना पक्ष चिन्ह आणि नाव शिंदे गटाला बहाल केल्यानंतर ठाकरे गटातील मोठ्या नेत्यावर दाखल करण्यात आलेला हा पहिला गुन्हा आहे.

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह 2 दिवस पुणे दौऱ्यावर होते. यावेळी अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. या टीकेला प्रत्युत्तर देताना राऊतांनी भाजपसह शिंदे गटातील नेत्यांना लक्ष केलं. याचवेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी उद्धव ठाकरेंवर केलेल्या टीकेला उत्तर देताना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यांविरोधात आक्षेपार्ह भाषेत टीका केली.