Lok Sabha Election 2024 : EVM ची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल

Lok Sabha Election 2024 : ईव्हीएमची पूजा केल्याप्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर या अडचणीत सापडल्या आहेत.
Case filed against rupali Chakankars after photo Of performing aarti of EVM at polling Booth goes Viral lok Sabha election
Case filed against rupali Chakankars after photo Of performing aarti of EVM at polling Booth goes Viral lok Sabha election

पुणे : राज्यात सध्या लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यासाठी मतदान होत आहे. या दरम्यान ईव्हीएमची पूजा केल्याप्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर या अडचणीत सापडल्या आहेत. चाकणकर यांच्या विरोधात सिंहगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ईव्हीएम मशीनची पूजा केल्या प्रकरणी त्यांच्याविरोधात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. या मतदारसंघात राष्ट्रवादीच्या दोन गटात लढत होत असून या लढतीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघात सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार या आमने सामने आहेत. यादरम्यान राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांचा एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटो मध्ये मतदान केंद्रावर चाकणकर या आरती करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडीयावर अनेकंना निवडणूक आयोगाच्या एक्स अकाउंटला टॅग करत याबद्दल विचारणा केली आहे.

Case filed against rupali Chakankars after photo Of performing aarti of EVM at polling Booth goes Viral lok Sabha election
Datta Bharane: 'तो कार्यकर्ता नव्हता, तर...'; शिवीगाळाच्या व्हिडिओवर दत्ता भरणे यांनी दिलं स्पष्टीकरण

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com