Kudal Police : प्रकाश आंबेडकरांविरोधातील आंदोलन भोवलं; शिवप्रेमी कार्यकर्त्यांवर कुडाळात गुन्हे दाखल

वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांसह आंबेडकर अनुयायांनी पोलिस निरीक्षक मुल्ला यांची घेतली भेट
prakash ambedkar on eknath shinde
prakash ambedkar on eknath shindeesakal
Summary

शिवप्रेमी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी करून एक दिवसाची मुदत दिली होती.

कुडाळ : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांच्या निषेधार्थ येथे आंदोलन करणाऱ्या सिंधुदुर्ग शिवप्रेमी कार्यकर्त्यांवर येथील पोलिस ठाण्यात (Kudal Police) गुन्हे दाखल झाल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महेश परूळेकर यांनी दिली.

prakash ambedkar on eknath shinde
Kolhapur : ओबीसी कोट्यातूनच आम्हाला आरक्षण मिळालं पाहिजे, अन्यथा उग्र आंदोलन छेडणार; मराठा समाजाचा थेट इशारा

हे गुन्हे दाखल व्हावे म्हणून काल दिवसभर वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी व आंबेडकर अनुयायी येथील पोलिस ठाण्यात ठाण मांडून होते. येथील राजमाता जिजाऊ चौकामध्ये शिवप्रेमी संघटनेतर्फे वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष आंबेडकर यांच्या निषेधार्थ आंदोलन छेडले होते.

वंचित बहुजन आघाडीतर्फे येथील पोलिस निरीक्षक रुणाल मुल्ला यांची नुकतीच जिल्हाध्यक्ष परुळेकर यांच्यासह कार्यकर्त्यांनी भेट घेतली होती. यामध्ये त्यांनी शिवप्रेमी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी करून एक दिवसाची मुदत दिली होती.

prakash ambedkar on eknath shinde
INDIA Alliance : देशात 'इंडिया अलायन्स' भक्कम, शरद पवार सुद्धा..; उलट-सुलट चर्चा सुरू असताना काँग्रेस नेत्याचं मोठं विधान
Kudal Police Station
Kudal Police Stationesakal

गुन्हे दाखल न झाल्यामुळे काल वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांसह आंबेडकर अनुयायांनी पोलिस निरीक्षक मुल्ला यांची भेट घेतली. त्यांना आपली भूमिका सांगितली. दरम्यान, यावेळी उपविभागीय पोलिस अधिकारी या दाखल झाल्या. त्यांच्यासोबतही शिष्टमंडळाने चर्चा केली. अखेर शिवप्रेमी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर कुडाळ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले.

prakash ambedkar on eknath shinde
Loksabha Election : आता मिशन लोकसभा! आमदार-मंत्र्यांमधील वाद मिटवून मुख्यमंत्र्यांनी आखली मोठी रणनीती, दिले महत्वाचे आदेश

वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष परुळेकर यांनी शिवप्रेमी संघटनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाल्याबाबतची माहिती दिली. यावेळी वंचित बहुजन आघाडीचे महासचिव प्रमोद कासले, कार्यकारणी सचिव संदीप जाधव, वेंगुर्ले तालुका अध्यक्ष वाय. जी. कदम, मालवण तालुकाध्यक्ष अक्षय कदम तसेच मोहन जाधव, प्रदीप कांबळे, मानसी सांगेलकर, रामदास जाधव, सत्यवान तेंडोलकर, विष्णू तेंडोलकर, चंद्रकांत वालावलकर, सुधीर अणावकर, नागेश कदम, शरद मोरे, विजय शेर्लेकर आदी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com