मुंबई : माजी पोलीस आयुक्तांच्या अडचणीत वाढ; CBI कडून तीन गुन्हे दाखल

एनएससी घोटाळ्याप्रकरणी केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर पांडे यांची सीबीआय चौकशी सुरू करण्यात आली आहे.
Sanjay Pande Mumbai CP
Sanjay Pande Mumbai CPSakal

मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे (Sanjay Pande) यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. कारण, सीबीआयने पांडे यांच्याविरोधात नवीन तीन गुन्हे दाखल केले आहेत. एनएससी घोटाळ्याप्रकरणी (NSE Fraud Case) केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर पांडे यांची सीबीआय चौकशी सुरू करण्यात आली आहे. एवढेच नव्हे तर, सीबीआयने पांडे यांच्या मुंबई आणि चंदीगड येथील घरांवरदेखील छापेमारी सुरू केली असून, मुंबईत जवळपास नऊ ठिकाणी छापेमारी करण्यात येत असल्याचे सांगितले जात आहे. (Sanjay Pande News In Marathi)

वास्तविक, संजय पांडे यांनी चित्रा रामकृष्ण प्रकरणात ऑडिट कंपनी तयार केली होती. ही कंपनी फक्त पांडे यांची होती. 2001 मध्ये संजय पांडे यांनी स्थापन केलेल्या ऑडिट कंपनीने NSE सर्व्हरशी छेडछाड केल्याबद्दल कोणालाही अलर्ट कसे केले नाही याचा तपास करण्यासाठी CBI 2018 पासून NSE लोकेशन घोटाळा प्रकरणाचा तपास करत आहे. यापूर्वी मार्चमध्ये संजय पांडे यांची सीबीआयने जवळपास 6 तास चौकशी केली होती. अनिल देशमुख यांच्याशी संबंधित 100 कोटींच्या वसुली प्रकरणात माजी पोलीस आयुक्तांची चौकशी करण्यात आली होती. त्यानंतर आता फोन टॅपिंग प्रकरणात सीबीआयकडून गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

Sanjay Pande Mumbai CP
उमेश कोल्हे हत्याकांड : NIA च्या तपासातून आणखी एक धक्कादायक खुलासा

वास्तविक, संजय पांडे यांनी चित्रा रामकृष्ण प्रकरणात ऑडिट कंपनी स्थापन केली होती. ही कंपनी फक्त पांडे यांची होती. अधिकाऱ्यांनी सांगितले की, संजय पांडे यांची चौकशी त्यांच्या कंपनी इसेक सिक्युरिटीज प्रायव्हेट लिमिटेडच्या कामकाजाशी संबंधित आहे. एजन्सीने या प्रकरणी एनएसईच्या माजी व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी चित्रा रामकृष्ण यांचा जबाब याआधीच नोंदवला असून, त्या सध्या तिहार तुरुंगात आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com