
परमबीर सिंह यांच्यावर तीन आरोप, CBI करणार चौकशी
मुंबई : केंद्रीय अन्वेषण ब्युरो (CBI) मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह (Parambir Singh) यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार, गैरवर्तन आणि पदाचा गैरवापर या आरोपांची चौकशी करण्यासाठी तीन प्राथमिक चौकशा करणार आहे. सिंह यांच्याविरोधात पाच गुन्हे दाखल झाल्यानंतर सीबीआयकडून या चौकशा करण्यात येत आहेत. याबाबत सूत्रांनी माहिती दिली आहे.
हेही वाचा: परमबीर सिंह प्रकरणी राज्य सरकार घेणार सुप्रीम कोर्टात धाव
परमबीर सिंह यांच्याविरोधात दाखल गुन्ह्यांचा तपास महाराष्ट्र पोलिस करत होते. पण, त्याविरोधात सिंह यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यानंतर न्यायालयाने महाराष्ट्र पोलिसांकडून तपास काढून घेत सीबीआयच्या विशेष गुन्हे शाखेकडे दिला. यावेळी न्यायालयाने राज्य सरकार आमि परमबीर सिंह या दोघांनाही फटाकरले होते.
2021 मध्ये अँटिलिया बॉम्ब प्रकरणात कथित गैरव्यवहार केल्याचा आरोप ठेवत सिंह यांनी मुंबई पोलिस प्रमुख पदावरून हटविण्यात आले होते. त्यानंतर त्यांनी परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटी वसुलीचे आरोप केले होते. तसेच याच प्रकरणातील आरोपी सचिन वाझेसोबत परमबीर सिंह यांचे चांगले संबंध असल्याचेही बोलले गेले. त्यामुळे सिंह यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता होती.
सिंह यांचे आरोप खोटे? -
सिंह यांनी देशमुख यांच्यावर लावलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने गेल्या वर्षी मार्चमध्ये न्यायमूर्ती केयू चांदीवाल (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली एकल सदस्यीय आयोगाची स्थापना केली होती. या आयोगाने मंगळवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना अहवाल सादर केला आहे. यामध्ये राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोप खोट असल्याचं चांदीवाल आयोगाने आपल्या अहवालात म्हटलं आहे.
Web Title: Cbi Register Primary Enquires Against Parambir Singh
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..