Money Laundering Case: सीबीआय करणार अनिल देशमुखांची पुन्हा चौकशी

सीबीआयला अनिल देशमुखांची नव्याने चौकशी करायची आहे.
Anil Deshmukh
Anil DeshmukhAnil Deshmukh

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh Money Laundering Case) यांची पुन्हा एकदा चौकशी करण्याची परवानगी सीबीआयला (CBI) देण्यात आली आहे. १०० कोटींच्या कथीत खंडणीप्रकरणी झालेल्या अटकेनंतर सध्या अर्थरोड कारागृहात असलेल्या देशमुखांचा नव्याने जबाब नोंदवण्यासाठी सीबीआयने मुंबई सत्र न्यायालयामध्ये ( (Mumbai Supreme Court) अर्ज केला होता. त्याला मंगळवारी (ता.१) कोर्टाने परवानगी दिली आहे. त्यानुसार आता ३,४,५ मार्चला सीबीआयचे अधिकारी चौकशी करणार आहेत.

ईडी ने मनी लाॅड्रिंग प्रकरणी चौकशी करून अनिल देशमुखांना अटक करून आरोपपत्र दाखल केले आहे. त्यातच आता सीबीआयला नव्याने चौकशी करायची असून, त्यासाठी त्यांनी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता. तो अर्ज कोर्टाने स्विकारून देशमुखांची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. यानुसार आता देशमुखाची चौकशी हणार आहे.

Summary

सीबीआयला नव्याने चौकशी करायची असून, त्यासाठी त्यांनी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख शंभर कोटी वसुलीच्या आरोपाखाली सध्या कोठडीत आहेत. त्यांनी जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. पण, निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझेने (Sachin Waze) ईडीला लिहिलेल्या पत्रामुळे देशमुखांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com