esakal | पोलिस महासंचालकांसह मुख्य सचिवांना पुन्हा येणार CBI चे समन्स?
sakal

बोलून बातमी शोधा

संजय पांडे-सीताराम कुंटे

पोलिस महासंचालकांसह मुख्य सचिवांना पुन्हा येणार CBI चे समन्स?

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पोलिस महासंचालक संजय पांडे (DGI Sanjay Pande) आणि गृह विभागाचे मुख्य सचिव सिताराम कुंटे (Chief Secreatary Sitaram Kunte) यांना या आठवड्यात सीबीआयकडून (CBI) पुन्हा समन्स येण्याची शक्यता आहे. यापूर्वी दोघांनाही समन्स जारी करण्यात आला होता. मात्र, त्यांनी चौकशीसाठी हजर राहू शकत नसल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्यांना वेळ वाढवून देण्यात आली होती.

हेही वाचा: अनिल देशमुखांच्या मुलासह सुनेला होणार अटक? CBI ची वारंटसह छापेमारी

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील १०० कोटींच्या आरोप प्रकरणात सीताराम कुंटे आणि पोलिस महासंचालक संजय पांडे यांची चौकशी केली जात असल्याची माहिती होती. यापूर्वी दोघांचाही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सीबीआयच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. मात्र, सीबीआयला जबाब नोंदवायचा असल्यामुळे दोघांनाही कार्यालयात उपस्थित राहावे, असे सीबीआयचे म्हणणे होते. त्यामुळे त्यांना ७ ऑक्टोबरला नोटीस बजावण्यात आली होती. मात्र, चिपी विमानतळाचा उद्घाटन सोहळा असल्यामुळे ते कोकणात होते. त्यामुळे सीबीआयकडे वेळ वाढवून मागितला होता. त्यानुसार सीबीआयने त्यांना वेळ देखील दिला. मात्र, त्यांना प्रत्यक्ष चौकशीसाठी हजर राहण्यासाठी सीबीआय पुन्हा समन्स बजावण्याची शक्यता आहे.

दरम्यान, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर १०० कोटी वसुलीचे आरोप केले होते. त्यानंतर अनिल देशमुख यांच्यामागे ईडी, सीबीआय, आयकर विभाग या तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. तसेच त्यांच्याशी संबंधित लोकांची देखील चौकशी केली जात आहे. याचप्रकरणी आता पोलिस महासंचालक संजय पांडे आणि मुख्य सचिव सिताराम कुंटे यांना सीबीआय समन्स बजावण्याची शक्यता आहे.

loading image
go to top