esakal | CTET 2021: केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर; पाहा निकाल

बोलून बातमी शोधा

Exams}

- ‘पेपर एक’मधील ३३.२५टक्के; तर ‘पेपर-दोन’मधील २१.६८ टक्के उमेदवार ठरले पात्र 

CTET 2021: केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाल जाहीर; पाहा निकाल
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

CTET 2021: पुणे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (सीबीएसई) जानेवारी २०२१मध्ये घेण्यात आलेल्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचा (सीटीईटी) निकाल शुक्रवारी (ता.26) जाहीर करण्यात आला. या परीक्षेच्या पहिल्या पेपरमध्ये (पेपर एक) ३३. २५ टक्के, दुसऱ्या पेपरमध्ये (पेपर दोन) २१.६८ टक्के उमेदवार पात्र ठरले आहेत. उमेदवारांना ‘www.ctet.nic.in’ किंवा ‘www.cbse.nic.in’ या संकेतस्थळावर निकाल पाहता येणार आहे. 

‘सीबीएसई’ने केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेचा निकाला जाहीर केला असून या परीक्षेतंर्गत ‘पेपर एक’साठी १६ लाख ११ हजार ४२३ उमेदवारांनी नोंदणी केली होती, त्यातील १२ लाख ४७ हजार २१७ जणांनी परीक्षा दिली. त्यातून चार लाख १४ हजार ७९८ उमेदवार पात्र ठरले आहेत. तर तब्बल १४ लाख ४७ हजार ५५१y उमेदवारांनी ‘पेपर दोन’साठी नोंदणी केली होती. त्यातील ११ लाख चार हजार ४५४ उमेदवारांनी परीक्षा दिली असून त्यापैकी दोन लाख ३९ हजार ५०१ उमेदवार पात्र ठरले आहेत. 

हे वाचा - पुणे येथील साखर संकुल परिसरात उभारणार जागतिक दर्जाचे साखर संग्रहालय !

ही परीक्षा दिलेल्या उमेदवारांना गुणपत्रिका ‘डिजीलॉकर’ देखील उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच पात्र उमेदवारांचे प्रमाणपत्र हे देखील ‘डिजीलॉकर’मध्ये अपलोड करण्यात आले आहे. हे प्रमाणपत्र पाहण्यासाठी ‘लॉगिन’ची आवश्यक माहिती ही परीक्षेसाठी अर्ज भरताना नोंद केलेल्या मोबाईल क्रमांकावर पाठविण्यात आली आहे. उमेदवारांना गुणपत्रिका आणि पात्रता प्रमाणपत्र हे डिजिटली उपलब्ध करून देण्यात आले असून हे माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार ग्राह्य धरले जाते. ‘डिजीलॉकर मोबाईल अॅप’ वापरत असाल, तर क्यूआर कोड हा स्कॅन करून त्यांची छाननी करणे आवश्यक आहे, असे ‘सीबीएसई’चे सचिव आणि ‘सीटीईटी’चे संचालक अनुराग त्रिपाठी स्पष्ट केले आहे. 

पुणे-सोलापूर मार्गावर आठवड्यातून पाच वेळा धावणार रेल्वे​

डिजिटल लॉकर उपलब्ध करून देण्याचे फायदे : 
- डिजिटली सक्षमीकरणाच्या दिशेने वाटचाल 
- प्रत्यक्ष गुणपत्रिका, प्रमाणपत्र प्रत्यक्ष जाऊन आणण्याचा वेळ वाचतो. 
- प्रशासकीय कामकाजातील ताण कमी करणे. 
- ‘झिरो पेपर वर्क’चे उद्दिष्ट साध्य करणे.  

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)