Corona Update : केंद्र सरकारकडून आंतरराष्ट्रीय प्रवासासंदर्भात मार्गदर्शक तत्वे जाहीर.... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

central government announced guidelines regarding international travel covid 19 health

Corona Update : केंद्र सरकारकडून आंतरराष्ट्रीय प्रवासासंदर्भात मार्गदर्शक तत्वे जाहीर....

मुंबई : केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने कोविदड संदर्भात आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या प्रवाशांसंदर्भात मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. जगातील काही देशांमध्ये कोविडच्या रूग्णसंख्येची झपाट्याने वाढत्या संख्येच्या लक्षात घेता केंद्र सरकारने ही पावले उचलेली जात आहे.भविष्यातील परिस्थीतीनुसार मार्गदर्शक तत्त्वांमध्ये सुधारणा करण्यात येतील.

या मार्गदर्शक तत्वात आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी तसेच विमानतळवर कोविड नियम पाळण्यासाठी प्रोटोकॉल दिले आहे. 24 डिसेंबर 2022 पासून पुढील आदेशापर्यंत ही मार्गदर्शक तत्वे लागू असतील.

मार्गदर्शक तत्वे

-प्रवासाचे नियोजन करणाऱ्या सर्व प्रवाशांचे लसीकरण पूर्ण असणे आवश्यक असेल.

- विमानतळावर तासेच प्रवासादरम्यान विमानात कोविड आणि त्याचा प्रसार न होण्यासाठी उपायां संदर्भात माहिती द्यावी

- प्रवासादरम्यान विमानात कोविडची लक्षणे दिसणाऱ्या कोणत्याही प्रवाशाला मानक प्रोटोकॉलनुसार विलिगिकरण कक्षात ठेवावे, फ्लाइट/प्रवासात इतर प्रवाशांपासून वेगळे केले जावे आणि त्यानंतर पुढील उपचारांसाठी विलिगीकरण सुविधेत हलवले जावे.

- विमानतळावर विमानातून आगमन करणाऱ्या प्रवाशांच्या रांगा मध्येसोशल डीस्टांसिंग सुनिश्चित करून डी बोर्डिंग केले पाहिजे.

- विमानतळावर सर्व प्रवाशांचे थर्मल स्क्रीनिंग करणे आवश्यक, स्क्रीनिंग दरम्यान लक्षणे आढळलेल्या प्रवाशांना ताबडतोब विलीगिकरण कक्षात नेले जाईल,

- विमानतळावर आगमन झालेल्या काही प्रवाशांची रँडम टेस्टिंग करावे.

- कोविड पोजिटिव प्रवाशांचे नमुने पॉझिटिव्ह आढळल्यास, त्यांचे नमुने पुढे जीनोमिकसाठी पाठवावेत

-कोणतीही लक्षणे आढळल्यास राष्ट्रीय हेल्पलाइन नंबर 1075/ राज्य हेल्पलाइन नंबरवर संपर्क साधावा.

-12 वर्षाखालील मुलांना आगमनानंतरच्या रँडम टेस्टिंग मधून सूट देण्यात आली आहे. तथापि, आगमनानंतर मुलांमध्ये लक्षणे आढळल्यास, त्यांची चाचणी केली जाईल आणि निर्धारित प्रोटोकॉलनुसार उपचार केले जातील.