

Maharashtra Greenfield Corridor Project
ESakal
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी (३१ डिसेंबर २०२५) केंद्रीय आर्थिक व्यवहार मंत्रिमंडळाने (CCEA) महाराष्ट्रातील ६-लेन ग्रीनफील्ड, प्रवेश-नियंत्रित नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडॉरच्या बांधकामाला मंजुरी दिली. एकूण ३७४ किलोमीटर लांबीचा हा कॉरिडॉर बीओटी (टोल) पद्धतीने सुमारे १९,१४२ कोटी रुपयांच्या खर्चाने विकसित केला जाईल.