
नागपूर : भारतीय हवाई दलाचा इतिहास, देशाला दिलेले योगदान आणि विविध युद्ध व मोहिमांचे स्मरण करून देणारे राज्यासह मध्य भारतातील पहिले संग्रहालय नागपूरमध्ये सुरू करण्यात आले आहे. भारतीय हवाई दलाच्या देखभाल कमांडचे प्रमुख एअर मार्शल विजय कुमार गर्ग यांच्या हस्ते या संग्रहालयाचे उद्घाटन झाले. हे संग्रहालय सामान्यांसाठी शुक्रवारपासून खुले झाले आहे.