

सोलापूर - प्रयागराज येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी मध्य रेल्वेने ३४ विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. १३ जानेवारी ते २६ फेब्रुवारी या कालावधीत प्रयागराज येथे होणाऱ्या कुंभमेळा दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस/पुणे - मऊ आणि नागपूर-दानापूर दरम्यान ३४ विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.