
मध्य रेल्वेने गेल्या आठ महिन्यात ३२.७७ लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत २१८ कोटी रुवयांचा विक्रमी दंड वसूल करून इतिहास रचला.
Central Railway : मध्य रेल्वेने फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत रचला इतिहास!
मुंबई - मध्य रेल्वेने गेल्या आठ महिन्यात ३२.७७ लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई करत २१८ कोटी रुवयांचा विक्रमी दंड वसूल करून इतिहास रचला आहे. भारतीय रेल्वेमध्ये आठ महिन्यात तिकीट तपासणीतून २१८ कोटी रुपये महसूल गोळा करणार पहिला झोन मध्य रेल्वे ठरला आहे.
मध्य रेल्वेने विना तिकीट आणि अनियमित प्रवासाला आळा घालण्यासाठी उपनगरीय लोकल गाड्या, मेल एक्स्प्रेस, प्रवासी सेवा आणि विशेष गाड्यांमध्ये तीव्र तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात आली होती. रेल्वेचा तिकीट तपासणी पथकाने एप्रिल ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीत ३२.७७ लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई केली आहे. या कारवाईत २१८ कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. गेल्या वर्षीच्या याच कालावधीत १२४.६९ कोटींची नोंद झाली होती . गेल्या वर्षीपेक्षा यंदा ७४.८३ टक्यांनी वाढ झाली आहे. भारतीय रेल्वेमध्ये तिकीट तपासणीतून नोंद झालेले २१८ कोटी रुपये आतापर्यंतचे सर्वाधिक आहेत. तर मध्य रेल्वेचा यापूर्वीचा सर्वाधिक २१४.१४ कोटी महसूल संपूर्ण आर्थिक वर्ष २०२१-२२ साठी होते.
२०२२-२३ या आर्थिक वर्षात तिकीट तपासणी कर्मचार्यांपैकी चार जणांनी एक कोटी रुपयांहून अधिक महसूल गोळा करून उत्कृष्ट कामगिरी केली.
हे आहे चार टीसी -
- भुसावळ विभागाचे मुख्य तिकीट परीक्षक, .के. के. पटेल यांनी १२,०२४ प्रकरणांमधून रुपये १.०५ कोटी दंड वसूल केला.
- भुसावळ विभागाचे तिकीट परीक्षक, विनय ओझा यांनी१२,९९० प्रकरणांमधून रु. १.०२ कोटी दंड वसूल केला.
- मुंबई विभागाचे तिकीट परीक्षक आर एम गोरे यांनी ११,०२४ प्रकरणांमधून १.०० कोटी दंड वसूल केला.
- पुणे विभागाचे मुख्य तिकीट परीक्षक एस. एस. क्षीरसागर यांनी १०,७७१ प्रकरणांमधून १.०२ कोटी दंड वसूल केला.