

Central Railway 186 Special Train
ESakal
मुंबई : होळीचा सण आणि उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात होणारी प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने १८६ विशेष गाड्या चालविण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये ९४ होळी विशेष आणि ९२ अतिरिक्त उन्हाळी विशेष गाड्यांचा समावेश आहे. मुंबई आणि पुणे या प्रमुख शहरांतून देशातील विविध महत्त्वाच्या स्थानकांदरम्यान या गाड्या धावणार आहेत.